शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमला सेना जशास तसे उत्तर देईल

By admin | Updated: August 31, 2015 20:56 IST

नितीन बानुगडे-पाटील : ओवेसी कलामांचा नव्हे, तर औरंगजेबाचा वारसा जपत असल्याची केली टीका

कऱ्हाड : ‘दिल्लीतील एका मार्गाला औरंगजेबाचे नाव होते, ते बदलून नुकतेच ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावर ‘एमआयएम’च्या ओवेसींनी नाराजी व्यक्त केली. यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते. ते कलामांचा नव्हे, तर औरंगजेबाचा वारसा जपू इच्छितात. त्यांना शिवसेना जशास तसे उत्तर देईल. जिल्ह्यात एमआयएमचा प्रवेश झाला असला तरी त्याची चिंता करण्याची गरज नाही,’ असे मत शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, कऱ्हाड दक्षिणचे तालुकाप्रमुख नितीन काशीद, शशिकांत हापसे, कऱ्हाड उत्तरचे तालुकाप्रमुख विनायक भोसले, कऱ्हाड शहरप्रमुख शशिराज करपे, उपशहरप्रमुख सतीश तावरे, दीपक मानकर, मलकापूर शहरप्रमुख मधुकर शेलार आदींची उपस्थिती होती. प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, ‘पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाचा समारोप होत आहे. गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. यामधून चिंतन आणि मंथन अशा दोन्ही गोष्टी झाल्या असून, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नजीकच्या काळात शिवसेना हा जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा पक्ष होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात व देशात सध्या शिवसेना सत्तेत सहभागी आहे. आम्ही सरकारमध्ये सहभागी असलो तरी सरकारजमा मात्र नाही. त्यामुळे भूसंपादन कायदा असो, ऊसदराचा प्रश्न असो. यावर शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. अनेक निवडणुकांना सामोरे गेलो आहोत; पण ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांवर जोपर्यंत शिवसेनेचा भगवा फडकत नाही, तोपर्यंत मोठ्या निवडणुकांमध्ये यश मिळविणे सोपे नाही, हे आमच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात शिवसेना या निवडणुका स्वबळावरच लढवेल. यात कोणाशीही युती अथवा आघाडी असणार नाही.’ (प्रतिनिधी) ‘शिवगौरव’ पुरस्काराने शिक्षकांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अनेकजण करतात; पण गुणवंत विद्यार्थी आणि समाज घडविण्यासाठी शिक्षकाच्या चाकोरीबाहेर जाऊनही अनेकजण काम करतात, अशा प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाचा ‘शिवगौरव’ पुरस्कार देऊन शिक्षक दिनाचे औचित्य साधून लवकरच सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. बानुगडे-पाटील यांनी यावेळी दिली. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना कृत्रिम पावसाचे केंद्र बारामती येथे झाले होते. आता ते मराठवाडा होऊ देणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोयना पाणलोट क्षेत्र परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसे झाले तरच वीज टंचाई व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल, असेही प्रा. बानुगडे-पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. पंधरा वर्षांपूर्वी राज्यात युतीचे सरकार असताना जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पंधरा महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा झाली; मात्र त्यानंतर आलेल्या आघाडी सरकारने फक्त दोनच योजना मार्गी लावल्या, हे आपले दुर्दैव आहे. त्या योजना मार्गी लावण्यासाठी पक्षीय पातळीवर प्रयत्न करू , असेही बानुगडे-पाटील यांनी सांगितले. कऱ्हाड जिल्ह्यासाठी आग्रही राहणार राज्यात जर काही नवे जिल्हे करावयाचे झाल्यास त्यात कऱ्हाडचा आग्रक्रमाने विचार करावा, अशी शिवसेनेची भूमिका राहील. जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या बहुतांशी बाबी कऱ्हाडत आहेत. त्यामुळे जिल्हा निर्मितीचा मार्ग सुकर आहे. जिल्ह्यातील शिवसैनिक त्यासाठी कुठेही मागे राहणार नाहीत.