सातारा : ‘जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेली कामे परस्पर दुसरीकडेच वळविल्याचा भांडाफोड नियोजन समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत सदस्यांनी केला. तेव्हा, ‘मंजूर कामे परस्पर कुठल्याही परिस्थितीत बदलू नका. आमदार व सरपंचांना विश्वासात घेऊन कामे करा,’ असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.‘पाटण तालुक्यातील मरळी गावची अंगणवाडी दुसऱ्याच ठिकाणी नेली गेली आहे. मी स्वत: मरळी गावचा रहिवासी व पाटण तालुक्यातील आमदार असतानाही मला याची माहिती दिली गेली नाही. प्रशासन मनमानी कारभार करत आहे. यामुळे संबंधित विभागाचा जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी केली. त्यावर मरळीत जागा उपलब्ध नसल्याने अंगणवाडी दुसरीकडे बांधली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्याने सांगितल्यानंतर ‘मला याबाबत विचारणा केली का? जागा आम्ही उपलब्ध करून दिली असती. अधिकारी असे निर्णय परस्पररीत्या कसे काय घेतात?’ असा संताप आ. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.असाच मुद्दा महाबळेश्वरचे डी. एम. बावळेकर यांनीदेखील उपस्थित केला. महाबळेश्वर तालुक्यातील सौंदरी येथील बौद्धवस्तीत बंधाऱ्यांची दोन कामे मंजूर केली होती. राजकीय आकसातून ही कामे लाखवड व येरणे या गावांत नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माण तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या इमारतीला जागा नसल्याचे सांगत हे काम जिल्हा परिषदेने अडवून ठेवल्याचा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी केला. ‘२६१.३० कोटीं’ना मंजुरीसन २०१६-१७ साठी २६१.३० कोटींच्या आर्थिक नियतव्ययास शनिवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती, विशेष घटक योजना सन २०१६-१७चा ७०.५४ कोटींचा आराखडा व आदिवासी कल्याणसाठी १७७.२७ कोटींचा आराखडा सादर केला. शिंगणापूर (ता. माण) येथील मुंगी घाटाच्या ८.२८ लाखांच्या परिपूर्ण प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. (
मंजूर कामे ‘हायजॅक’ केल्याचा भांडाफोड!
By admin | Updated: July 16, 2016 23:30 IST