शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

रणरागिणींच्या आक्रमक पवित्र्याने दारूबंदीचा ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 17:23 IST

नागठाणे, ता. सातारा येथील ग्रामपंचायतीने रविवारी आयोजित केलेल्या सभेमध्ये महिलांच्या आक्रमकतेमुळे दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. संपूर्ण गावातून दारूबंदी होणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

सातारा, दि. ३ :   नागठाणे, ता. सातारा येथील ग्रामपंचायतीने रविवारी आयोजित केलेल्या सभेमध्ये महिलांच्या आक्रमकतेमुळे दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. संपूर्ण गावातून दारूबंदी होणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

  सरपंच विष्णू  साळुंखे-पाटील यांनी रविवारी होणाºया ग्रामसभेला महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नागठाणे येथील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. दारूबंदीच्या ठरावावर एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला एकवटण्याची बहुदा ही पहिलीच वेळ होती. सुमारे ६० ते ७० महिला या ग्रामसभेला उपस्थित होत्या.

दारूमुळे  अनेकांचे  संसार उद्ध्वस्त झाले आहेत.  नागठाणे गावातून दारूचा समूळ नाश करावा तसेच गावात दारू पिणारी व्यक्ती सापडल्यास त्यास दंडात्मक कारवाई करावी व गावचे पालक या नात्याने संबंधिताला शिक्षा करावी, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.

 सरपंचानी घेतलेल्या निर्णयास आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. त्यानंतर या सभेत महिलांनी एकमुखाने नागठाणे गावात संपूर्ण दारूबंदी चा ठराव केला. या सभेच्या ठरावाची नक्कल संबंधित कार्यालयास पुढील कार्यवाहीसाठी लवकरच पाठविली जाईल, असे सरपंच विष्णू साळुंखे यांनी यावेळी सांगितले.