शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास अधिकाऱ्याची अखेर कोरेगावला नेमणूक

By admin | Updated: October 14, 2015 00:01 IST

ग्रामपंचायत पदाधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश

कोरेगाव : कोरेगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांनी केलेल्या अभिनव आंदोलनामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली आहे. ग्रामसेवक संघटनेच्या पवित्र्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी अरुण गायकवाड या ग्रामविकास अधिकाऱ्यांची मंगळवारी नियुक्ती केली . गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि कामकाजाला सुरुवात केली आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत होत आहे. ग्रामविकास अधिकारी नंदकुमार जगताप यांच्या अकाली निधनानंतर ग्रामसेवक संघटनेने कोरेगावात काम करण्याविषयी असमर्थता दर्शविली होती. स्थानिक विषय जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात ग्रामविकास अधिकारी देण्याबाबत निर्णय झाला, मात्र ज्या ग्रामसेवकाची नियुक्तीचे आदेश काढले जातात, ते रजेवर जाण्याचा प्रकार सुरु झाला आहे. ग्रामपंचायत सदस्य दिलीप बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी संघटनेने आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानापर्यंत रॅली काढून त्यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडले, त्यांनी देखील तातडीने अधिकाऱ्यांना सूचना देऊन कोरेगावात ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले, मात्र पंचायत समिती प्रशासन ज्या ग्रामसेवकाची नियुक्ती करते, ते लगेच रजेवर जात असल्याने कामकाज रखडले होते. सरपंच विद्या येवले, उपसरपंच राहूल रघुनाथ बर्गे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बर्गे, प्रदीप बोतालजी, संतोष चिनके, प्रतिभा बर्गे, रसिका बर्गे, मनोज येवले, शंकरराव बर्गे, डॉ. गणेश होळ, युवराज बर्गे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय ते पंचायत समिती अशी रॅली काढली आणि पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरु केले. कोरेगाव नगरविकास कृती समितीचे पदाधिकारी राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, संतोष नलावडे यांच्यासह नागरिकांनी आंदोलनास पाठिंबा दर्शविला. (प्रतिनिधी)मासिक सभा लवकरच..--अरूण गायकवाड यांनी धरणे आंदोलनातील कर्मचाऱ्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून, ग्रामपंचायतीची मासिक सभा देखील त्यांनी बोलविण्याचे नियोजन केले आहे.