सातारा : शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. केशव राजपुरे यांची भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
प्रा. राजपुरे यांनी महिन्यापूर्वीच अधिविभाग प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीमुळे आपोआप त्यांचे नाव शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या सभासद यादी मध्येदेखील गेले आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी प्लॉस बायोलॉजी या नियतकालिकात जगातील शीर्ष २ टक्के शास्त्रज्ञांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात प्रा. राजपुरे यांचा पदार्थ संशोधकांच्या यादीत समावेश आहे.
सुरवातीला शीर्ष २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान, नंतर अधिविभाग प्रमुख पद व आता अभ्यासमंडळ अध्यक्षपदी नियुक्ती असे सलग तीन सन्मान मिळवल्याने त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. प्राध्यापक राजपुरे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन वाई तालुक्यातील बावधन पंचक्रोशीचे नाव आज विद्यापीठाच्या अधिकार मंडळात झळकवले आहे. याबद्दल त्यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
०४केशव राजपुरे