शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

खेमावती नदीच्या पात्राला उकिरड्याचे स्वरूप

By admin | Updated: March 30, 2016 00:25 IST

कचऱ्याचा खच : लोणंदमधील गटारे तुंबलेली अन् मोकाट जनावरांचा सुळसुळाट--लोणंदचं रणकंदन

राहिद सय्यद -- लोणंद -लोणंद शहरातून वाहणाऱ्या खेमावती नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी काटेरी झुडपे, पान कनिस, जलपर्णीने आच्छादन आहे. नागरिकांकडून नदीत कचरा टाकण्यात येतो, त्यामुळे नदीपात्राला उकिरड्याचे स्वरूप आले आहे. लोणंद गावातील गटारे व सांडपाणी या नदीपात्रात सोडल्याने नदीचे गटार झाले आहे. अरुंद उतार आणि उघडी गटारे, त्यातच टाकला जाणारा ओला व सुका कचरा, आजूबाजूला पडलेले प्लास्टिक अन्य प्रकारचा कचरा त्यात टाकला जातो. त्यामुळे या भागातील गटारे सातत्याने तुंबलेली दिसतात. त्यातच मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे प्रभाग ७,८ व ९ या तिन्ही प्रभागांतील नागरिकांना सांडपाणी व्यवस्था गटारेअंतर्गत रस्ते अशा भरपूर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लोणंद खंडाळा रस्त्यालगत असलेल्या बाजारतळ व एचपी गॅस एजन्सीच्या बाजूला उघड्या गटारातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील लोकांना नेहमी आजाराला सामोरे जावे लागते. लोणंद नगरपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांनी प्रचाराची आघाडी घेतली असता या प्रश्नांकडे मात्र ७, ८ व ९ या प्रभागांतील उमेदवारांनी लक्ष देण्याची गरज आहे. १७ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या १७ जागांसाठी ५० टक्के महिला आरक्षण असल्याने लोणंद नगरपंचायतीत महिलाराज येणार आहे. या प्रभागांमध्ये महिलांचे वर्चस्व राहील. प्रभाग ७ हा १११४ लोकसंख्येचा प्रभाग असून, मतदार संख्या ६२२ इतकी आहे. येथे इतर मागास महिला आरक्षण आहे. प्रभाग ८ हा बिरोबा वस्ती, शेळके वस्ती, आनंदनगर परिसर मतदार संख्या १,२११ आहे. मूलभूत सुविधा तरी पुरवा...कचरा कुंडी नसल्याने नागरिक सर्व कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात, त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने आसपासच्या परिसरामध्ये दुर्गंधीचे वातावरण पसरते.- लीला क्षीरसागर, प्रभाग ७या प्रभागांमध्ये पाणी अनियमित व एक दिवसाआड येते. कचऱ्याची विल्हेवाट लावणे, गटारे साफ करणे या मूलभूत सुविधांचा अभाव असून, या प्रभागात नागरिकांसाठी लहान मुलांसाठी प्ले-ग्राउंड होण्याची गरज आहे.- नानासो केसकर, प्रभाग ८खेमावती नदीचे प्रदूषण टाळले पाहिजे, सांडपाणी, सुका कचरा, ओला कचरा घनकचरा याचे व्यवस्थापन केले पाहिजे. अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले पाहिजे.- महादेव क्षीरसागर, प्रभाग ९