शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:29 IST

सातारा : कोविड-१९च्या पार्श्‍वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना राज्य शासनाने सानुग्रह अनुदान म्हणून १५०० रुपये अर्थसाहाय्य देण्याबाबत घोषणा केली आहे. ...

सातारा : कोविड-१९च्या पार्श्‍वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना राज्य शासनाने सानुग्रह अनुदान म्हणून १५०० रुपये अर्थसाहाय्य देण्याबाबत घोषणा केली आहे. ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे. परवानाधारकांनी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन

अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.

याबाबत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करताना परवानाधारकांनी अनुज्ञप्ती क्रमांक, वाहन क्रमांक आणि आधार क्रमांकाची माहिती भरणे आवश्यक आहे. एकूण ५७२९ इतके अधिकृत परवानाधारक रिक्षाचालक असून त्यांपैकी ४ जूनअखेर १०३४ परवानाधारकांनी सादर केलेल्या अर्जांचा निपटारा करण्यात आलेला आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑटोरिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते व मोबाईल क्रमांक आधार कार्ड क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. बहुतांश रिक्षाचालकांचे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक संलग्न नसल्याने किंवा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी पोस्ट खात्यामार्फत सातारा जिल्ह्यातील विविध पोस्ट कार्यालयांमध्ये एकूण ४८ ठिकाणी आधार संलग्न सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व ऑटो रिक्षा परवानाधारकांनी कार्यालयास ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.