शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

काकड आरतीसोबतच गोमातेचेही पूजन !

By admin | Updated: December 11, 2014 23:51 IST

गोंदवले यात्रा : हजारो भाविकांना गो-शाळेचेही आकर्षण

गोंदवले : गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांच्या यात्रेंतर्गत गोंदवले बुद्रूक येथील श्रींच्या समाधी मंदिरात सालाबादप्रमाणे काकड आरतीबरोबरच गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांना गो-शाळेचे आकर्षण असल्याचे दिसून आले.श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या गोरक्षणाचा वारसा गोंदवले बुद्रूक येथील श्रींच्या समाधी मंदिराने आजही जपला आहे. वारंवार येत असलेल्या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करुन सांडपाण्याचा योग्य वापर करुन गायींसाठी ओला चारा मिळविण्यातही यश मिळविले आहे.श्री गोंदवलेकर महाराजांनी प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण दिली होती. त्यांच्या गोरक्षण व गोपालनाच्या प्रेमामुळे त्यांना गोपालक ‘श्रीकृष्ण’ अवतारही मानले जाते. श्री गोंदवलेकर महाराजांचा गोपालनाचा वारसा आजही येथील समाधी मंदिर समितीने अखंडपणे सुरू ठेवला आहे. याचेच प्रतीक म्हणून आजही येथील मंदिर परिसरात अखंडपणे सुरू ठेवला आहे. याचेच प्रतीक म्हणून येथील मंदिर आवारात सर्व सोयींयुक्त गोशाळा सुरू केली आहे. ती आजही पाहायला मिळते. महाराजांच्या शेतातूनच या जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता केली आहे. ओल्या चाऱ्यासाठीही शेतात स्वतंत्र पिके घेतली जातात. दुष्काळी परिस्थितीत चारा मिळविण्यासाठी सांडपाण्याचा योग्य पद्धतीने वापर केला जातो. याशिवाय शेतीसाठी उत्तम प्रतीचे खत उपलब्ध करण्यासाठी अनेक वर्षांपासून येथे गांडूळ प्रकल्प उभारण्यात आला आहे.जनावरांपासून मिळणाऱ्या शेणाचा गांडूळ निर्मितीसाठी उपयोग केला जातोच शिवाय गोबरगॅसच्या माध्यमातून इंधनही मिळविले जाते. गायीपासून मिळणारे दूध येथे येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादासाठी वापरले जाते. या दुधापासुन बनविलेल्या लोण्याच्या गोळ्याला विशेष महत्त्व आहे. काकड आरतीनंतर भाविकांना लोण्याचा प्रसाद दिला जातो.जनावरांचे दूध काढण्यासाठीही अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला जातो. गोशाळेतील जनावरांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांकडूनही जनावरांची सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. पूर्वी गोदान करण्याची प्रथा होती.गोंदवलेकर महाराजांनी दिलेल्या गो-रक्षणाच्या शिकवणीमुळे या ठिकाणी गायींचा मोठा असलेल्या ठिकाणीच श्रींची समाधी स्थानापन्न करण्यात आली आहे. समाधी मंदिरात श्रींच्या समाधीच्या वरच्या भागात गोपालक श्रीकृष्ण मंदिर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी रोज पहाटे काकड आरतीच्या वेळी गो-शाळेतील गायींचेही पूजन केले जाते. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. (वार्ताहर)स्वयंचलित नळगोंदवले येथे सुरू केलेल्या गोशाळेतील गायींनी पाण्याच्या भांड्याजवळ तोंड नेताच नळाच्या साह्याने पाणी येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी बसविलेल्या स्वयंचलित नळामुळे पाण्याचीही बचत होत असून त्यासाठी स्वतंत्र माणूस नेमण्याची गरज भासत नाही.