शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

ढगाळ वातावरणामुळे चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

............................................. शेकोट्या पेटू लागल्या दहीवडी : माण तालुक्यात हळूहळू थंडी वाढू लागली आहे. यामुळे गावोगावी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. ...

.............................................

शेकोट्या पेटू लागल्या

दहीवडी : माण तालुक्यात हळूहळू थंडी वाढू लागली आहे. यामुळे गावोगावी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत रब्बी हंगामातील पिकेही चांगली आली आहेत. शेतकरी सध्या भांगलणी करून पिकांना पाणी देऊ लागले आहेत. त्यातच थंडी वाढू लागली आहे. परिणामी गारठ्यात वाढ झाल्यामुळे गावोगावी शेकोट्या पेटविण्यात येत आहेत.

.................................................

बाजारांमुळे कोरोनाचा धोका

सातारा : जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू असले तरी लोकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. बाजाराच्या ठिकाणी अनेक गावचे ग्रामस्थ येतात. तसेच गर्दीतच खरेदी करण्यात येते. काही नागरिक तर तोंडाला मास्कही लावत नाहीत. यामुळे कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. शासन नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

............................

नागरिकांचा प्रतिसाद

सातारा : येथील भैरोबा डोंगरी ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सातारा-सज्जनगड पदभ्रमंती उपक्रमास नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरवर्षी हा उपक्रम डोंगरी ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात येतो. या उपक्रमामुळे पदभ्रमंतीच्या निमित्ताने निसर्गात राहण्याची संधी मिळते.

...................

बळीराजावर संकट

खटाव : खटाव तालुक्‍यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अवेळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील शेतकरी कधी ढगाळ वातावरण, तर कधी गारठा, तर कधी पाऊस अनुभवत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांत भीती असल्याचे चित्र आहे.

..............

कांद्याचे तरवे तेजीत

सातारा : मागील तीन ते चार महिन्यांपासून कांद्याला मिळत असलेला दर शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. परिणामी कांदारोपे अर्थात तरव्याची मागणी वाढल्यामुळे दर तेजीत आले आहेत. पूर्वी वाफ्यावर होणारी तरवा विक्री आता फुटावर केली जात आहे.

..........

पक्ष्यांचा वावर

सातारा : येरळवाडी (ता. खटाव) नावाप्रमाणेच कुमठे मापरवाडी (ता. सातारा) तलावातही दुर्मिळ व स्थलांतरित कृष्णबलक पक्ष्यांचे आश्रयस्थान बनला आहे. सध्या या ठिकाणी ‘कृष्णबलक’च्या १२ जोड्यांचे आगमन झाले आहे. मायणी, येरळवाडी हे तलाव पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरत असतानाच कुमठे तलाव हा देखील आता दुर्मिळ आणि स्थलांतरित ‘कृष्णबलक’चे आश्रयस्थान बनले आहे.

...

द्राक्षबागांचे नुकसान

म्हसवड : माणमध्ये गेले दोन दिवस अचानक सर्वत्र ढगाळ वातावरणाबरोबरच धुके टिकून राहून रात्रं-दिवस रिमझिम पाऊस पडत राहिल्याने आंबा, द्राक्ष, रब्बी हंगामातील फुलोऱ्यात आलेल्या ज्वारीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पळसावडे, देवापूर, काळचौंडी, जांभुळणी, वरकुटे मलवडी, हिंगणी, शेनवडी आदी गावांच्या परिसरात द्राक्ष व आंब्याच्या बागा मोठ्या संख्येने आहेत.