लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात सोमवारी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या एक हजार ८१९ वर पोहोचली आहे. तसेच नवे ३९ रुग्ण आढळून आले असून, बाधितांची संख्या ५६ हजार ५४१ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात गत तीन आठवड्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, रविवारी रात्री ६५ रुग्ण आढळून आले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चिमणगाव, ता. कोरेगाव येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
दरम्यान, सोमवारी दिवसभरात ६४ जण, तर आतापर्यंत ५३ हजार ९२४ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तसेच सोमवारी दिवसभरात ३२३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गत काही दिवसांपासून तपासणीसाठी रुग्णालयात गर्दी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.