सध्या तीनशे साठ कोटी रुपये ठेवींचे संकलन केले असून, २५०:५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. आजअखेर संस्थेचे वसूल भागभांडवल साडेसोळा कोटी झाले आहे. सभासद संख्या वीस हजार २०६ इतकी झाली आहे. संस्थेला ऑडिट वर्ग ''अ'' प्राप्त झाला आहे. स्पर्धेच्या युगातही आपल्या संस्थेचा पाया भक्कम झाला आहे.
मायणी (ता. खटाव) येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे कऱ्हाड मर्चंटमध्ये विलीनीकरणाचा ठराव दिलीप पुस्तके यांनी मांडला. त्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन व्यवस्थापक किशोर झाड यांनी केले. सुरेश पवार यांनी ठरावास मंजुरी घेतली. अरुणा चव्हाण यांनी स्वागत केले. विलास पवार यांनी आभार मानले. (वा. प्र.)
-------
फोटो : पाठवून देत आहे.