शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

ऐन दिवाळीत राजकीय पटलावर आतषबाजी!

By admin | Updated: October 18, 2016 22:50 IST

खंडाळा नगरपंचायत : प्रमुख राजकीय पक्षांची नेते मंडळी गुंतली सुयोग्य उमेदवाराच्या शोधात--खंडाळा नगरपंचायत राजकारण

दशरथ ननावरे --खंडाळा खंडाळा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत विजयाचे फटाके फोडण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी दंड थोपटले आहेत. दिवाळी सरतानाच दि. २७ नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी ही दिवाळी आनंदाची तर प्रमुख नेत्यांसाठी रोमहर्षक ठरणार आहे. ऐन दिवाळीत निवडणुकीने राजकीय पटलावर आतषबाजी रंगणार आहे.खंडाळा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रत्येक प्रभागाची स्वतंत्ररीत्या नगरसेवक निवड होऊन त्यामधून नगराध्यक्ष निवड केली जाणार आहे. खंडाळ्यात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसने आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. मात्र नगरपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडत आहेत. काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारंपरिक अटीतटीच्या लढतीत यावेळी शिवसेना व भाजपनेही उतरण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे सध्या तरी खंडाळ्यात चौरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. गेल्या महिन्याभरात प्रत्येक प्रभागातून उमेदवारांची चाचपणी करण्याचे काम प्रमुख नेते मंडळींकडून सुरू आहे. विशेषत: नगराध्यक्ष पदासाठी इतर मागास प्रवर्गातील राखीव मतदार संघ तसेच महिला उमेदवारांच्या प्रभागावर सर्वांनीच लक्ष केंद्रित केले होते. मात्र, या प्रभागांमधून कोण-कोण इच्छुक आहेत, याबाबतची कमालीची गुप्तता सर्वच पक्षांनी पाळली होती. आता निवडणूकच जाहीर झाल्याने आपापले प्यादे रणांगणात उतरविण्यासाठी सर्वचजण सज्ज राहणार आहेत.नगरपंचायतीसाठी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलची धुरा पंचायत समितीचे सदस्य अनिरुद्ध गाढवे, प्रकाश गाढवे, श्रीराम गाढवे, प्रल्हाद खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली सांभाळली जाणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. शामराव गाढवे, प्रा. भरत गाढवे, शैलेश गाढवे, संतपराव खंडागळे, आप्पासाहेब वळकुंदे, शिवाजीराव खंडागळे यांनी पूर्ण क्षमतेने पक्षाची धुरा सांभाळण्याचे निश्चित केले आहे. नवख्या भाजपाची खंडाळ्यातील पहिलीच इनिंग अभिजित खंडागळे यांच्या हाती राहणार आहे, तर शिवसेनेला फक्त शहरप्रमुख मंगेश खंडागळे यांचाच आधार वाटतो.वास्तविक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धामधुमीत भाजपाने आजपर्यंत पाळलेली गुप्तता आणि शिवसेनेची पुढील आखणी याचा निश्चित परिणाम जाणवणार आहे. त्यातच भाजप-शिवसेनेचे सूत जुळल्यास तिसरा पर्याय उभा राहू शकतो. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत खंडाळ्याच्या राजकारणात होणाऱ्या घडामोडी निवडणुकीची दिशा ठरवून जाणार आहेत. मात्र, निवडणुकीची रणधुमाळी दिवाळीतच रंग भरणार असल्याने खंडाळ्यातील कार्यकर्ते मात्र उत्साहात आहेत, हे नक्की.मतदार याद्यांची उपलब्धताखंडाळा नगरपंचायतीसाठी निवडणुका जाहीर झाल्या. मात्र, प्रभागवार मतदार याद्या मात्र अद्यापपर्यंत नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध नसल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक १५ रोजी आॅनलाईन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ज्यांना प्रभागवार याद्या हव्या असतील त्यांनी अर्ज द्यावेत. याद्या उपलब्ध करून दिल्या जातील, असे तहसीलदार शिवाजीराव तळपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रभाग क्र.पुरुषस्त्रीएकूणप्रभाग क्र.पुरुषस्त्रीएकूणप्रभाग क्र.पुरुषस्त्रीएकूण१६८६०१२८७१४३१४१२८४१३१४५१५७३०२२८०७९१५९८१५७१३४२९११४१४०१४१२८१३९३९८१९१९१६२१८१३४३१५१२४१२४२४८४१४५११६२६११०२३०२४९४७९१६१५९१६३३२२५९४८६१८०१११७३१४६३१९१७१३४१३०२६४६१०७१२०२२७१२१८७१७७३६४एकूण२३११२३०२४६१३