शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

अण्णासाहेबांच्या हाती आली लेखणी...

By admin | Updated: November 16, 2014 23:34 IST

डाटा आॅपरेटर संपावर : संगणकावरील दाखले बंद ; एक हजारजण बंदमध्ये

नितीन काळेल -सातारा -गावचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीतील संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या हाती आता बऱ्याच दिवसांनी दाखले देण्यासाठी लेखणी आली आहे. त्यातच संगणकावरील दाखले मिळत नसल्याने ग्रामस्थांनाही असे दाखले शासकीय कामासाठी चालणार का, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे मागण्या मान्य होणार का? म्हणून परिचालक व दाखला चालणार का? म्हणून ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण आहे. ग्रामपंचायत ही गावचा कणा समजली जाते. ग्रामपंचायतीमार्फत गावचा कारभार पाहिला जातो. सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या बरोबरीने ग्रामसेवक गावच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. ग्रामसेवक व सरपंचाकडून काही दाखले देण्यात येतात. शासकीय कामांसाठी हे दाखले महत्त्वाचे असतात. मागील काही वर्षांपर्यंत ग्रामसेवकांनी किंवा त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी हाताने लिहिलेला दाखला चालत होता. मात्र, काही वर्षांपूर्वीपासून ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांच्या जोडीला संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) हे पद निर्माण करण्यात आले. जवळपास राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीत हे पद तयार झाले. त्यामुळे राज्यात आज सुमारे २७ हजार तर सातारा जिल्ह्यात १०२७ परिचालक कार्यरत आहेत. यांना शासन निर्णयानुसार पगार देण्यात येत आहे. मात्र, या परिचालकांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. आतापर्यंत संगणकावरून काही सेकंदात दाखल मिळत होता. मात्र, आता या काम बंदमुळे ग्रामसेवकांना दाखला लिहून देणे भाग पडले आहे. दररोज अनेकजण दाखले मागण्यासाठी येतात. त्याची पूर्तता करता-करता दिवस संपत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांना या काम बंदमुळे इतर कामांपेक्षा दाखला देण्यातच जास्त वेळ द्यावा लागत आहे. जिल्ह्यात सुमारे १५०० ग्रामपंचायती असून, सध्या १ हजार २७ संगणक परिचालक कार्यरत आहेत. जवळपास सर्व परिचालकांनी काम बंद केले आहे. त्यामुळे ८० टक्क्यांहून अधिक ठिकाणचे संगणकावरून दाखले देण्याचे काम बंद झाले आहे. त्यातच शासनाने हस्तलिखित दाखल ग्राह्य न धरता संगणकावरील दाखलेच गृहित धरण्याचे धोरण आखले आहे. या काम बंदमुळे हस्तलिखित दाखले चालणार का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मागण्या मान्य होणार का? म्हणून परिचालक तर हस्तलिखित दाखले चालणार का? म्हणून ग्रामस्थ हैराण आहेत. पंचायत समितीसमोरआज ठिय्या आंदोलनमागण्या मान्य करण्यात याव्यात, यासाठी चार दिवसांपासून संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या मागण्यावर विचार न झाल्यामुळे सोमवार, दि. १७ रोजी जिल्ह्यातील काही पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. काही ठिकाणी सफाई अभियान हाती घेण्यात येणार आहे.१९ प्रकारचे असतात दाखले ग्रामपंचायतीमार्फत १९ प्रकारचे दाखले देण्यात येतात. आॅनलाईन रजिस्टर नोंद करणे, जन्म, मृत्यूचा दाखला देणे, रहिवासी, वर्तणूक, बांधकाम परवाना, दारिद्र्यरेषेखाली दाखला आदी दाखले देण्यात येतात. संगणकावर डाटा तयार असल्यामुळे काही सेकंदात हे दाखले मिळत होते; पण आता हस्तलिखितामुळे खूपच वेळ जात आहे. आम्ही सर्वांची काळजी करतो. दाखले देण्याची जबाबदारी आम्हीच घेतो. लोकांचे ऐकतो; पण आमची काळजी शासनाला नाही. आमच्या मागण्यांबाबत कोणी ऐकत नाही. म्हणून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. -प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष संगणक परिचालक संघटनासंगणक परिचालकांच्या काम बंद आंदोलनामुळे संगणकावरील दाखले देणे जवळपास बंद झाले आहे. जिल्ह्णात सुमारे ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता ग्रामसेवकांनाच दाखला लिहून देणे भाग पडले आहे.- खाशाबा जाधव, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनातोकडा पगार...१३ व्या वित्त आयोगातून ८ हजार ५०० रुपये जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे वर्ग होतात. तेथून संबंधित एका कंपनीकडे हे पैसे जातात. त्यानंतर ती कंपनी संगणक परिचालकांना पगार देते. बारावीवाल्यांना ३ हजार ८०० तर, पदवीधारकांना ४ हजार १०० रुपये देण्यात येतात. त्यामुळे कमी पगार मिळत असल्याचाही आरोप संघटना करीत आहे.