शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासाहेब.. असून अडचण, नसून खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2015 00:23 IST

न्याय मागायचा कुठे? : वरकुटे मलवडीसह चार गावांचा प्रश्न; दाखले, सातबारा उतारा वेळेत मिळत नाही

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडीसह महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी, बनगरवाडी गावांना तलाठी असून, अडचण आणि नसून खोळंबा असाच काहीसा प्रकार गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे. सातबारा उतारे, विविध दाखले वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न पडला आहे.वरकुटे मलवडी परिसरातील छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्यांची एकंदरीत लोकसंख्या आठ-दहा हजारांच्या आसपास आहे. या लोकांसाठी मुख्य कार्यक्षेत्र वरकुटे मलवडी हे गाव आहे. वरकुटे मलवडी येथे अनेक वर्षांपासून एकच तलाठी कार्यरत आहे. वर्षभरापूर्वी मधुकर सोनवणे हे तलाठी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून वरकुटे-मलवडीत दररोज नित्य नियमाने येऊन काम पाहणारा असा एकही तलाठी लोकांना लाभला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरीवर्गासह विद्यार्थी आणि नागरिकांची दाखला, उताऱ्यांची कामे खोळंबलेली आहेत.सोनवणे यांच्या निवृत्तीनंतर बदलीवर आलेल्या तीन-चार तलाठ्यांनी कार्यालयीन दफ्तर आॅनलाईन करावयाच्या नावाखाली टंगळमंगळ करीत कामकाज केले नाही. काही तलाठी वरकुटे मलवडी येथे काम करायचे नाही म्हणून येत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांस फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वरकुटे मलवडी येथे तलाठी नियमीत येत नसल्याने सातबारा, दाखले पाहिजे असल्यास सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या म्हसवडला जाऊन ते घ्यावे लागत आहेत. त्यातच सध्या दहावी-बारावीच्या मुलांचे निकाल लागल्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता जातीचे दाखले, रहिवाशी दाखले अशा अनेक कागदपत्रांची गरज भासत आहे. अशावेळी वेळेत दाखले मिळत नाहीत. प्रामुख्याने शैक्षणिक कामे वेळेवर पूर्ण नाही झाली तर होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्न आहे.तरी संबंधित विभागाने वरकुटे मलवडी येथे कायमस्वरूपी काम पाहणारा तलाठी द्यावा, अशी मागणी वरकुटे मलवडीसह परिसरातील जनतेतून होत आहे. (वार्ताहर)वरकुटे मलवडीला अनेकांचा नकार...वरकुटे मलवडी येथे एखाद्या तलाठ्याची बदली झाली तर रुजू होण्यास त्यांचा प्रथम नकारच असतो. त्यामुळे या गावाला वर्षभरात नियमीत येणारा एकही तलाठी लाभलेला नाही. गेल्या एक वर्षापासून अनेक तलाठ्यांनी वरकुटे मलवडी येथे काम पाहिले आहे. त्यामुळे वरकुटे मलवडीसह चार गावांसाठी नियमीत व वेळेवर येणाऱ्या तलाठ्याची प्रतीक्षा आहे. सध्या शाळा, महाविद्यालये प्रवेशाचे दिवस आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर कागदपत्रे मिळण्याची गरज आहे. त्यादृष्टीने वरकुटे मलवडी येथे तलाठ्याची नियुक्ती करणे गरजेचे आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.