वाई : ‘देशाच्या जडणघडणीत ज्या राष्ट्रीय महापुरुषांनी फार मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत शाहिरीने समाज जागृती करणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे,’ अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केली.
वाई येथे राष्ट्रीय महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष अनिल सावंत, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विराज शिंदे, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, दिगंबर आगवणे, महाबळेश्वर उपनगराध्यक्ष अफजल सुतार, शीतल मिसाळ, कृष्णा कांबळे, प्रदीप होळकर, डॉ. शुभम शिंदे, नगरसेवक सतीश वैराट यांचा गौरव करण्यात आला. तसेच वाई तालुक्यातील चाळीस आशा स्वयंसेविकांचाही सन्मान करण्यात आला आहे.
कार्यक्रमास उपाध्यक्ष शिवाजी अवडघडे, मोहमद शेख, सुनंदा पवार, प्रवीण संकपाळ, मनीषा संकपाळ, संजय सकटे, प्रमोद अनपट, अरुण जायकर, सोमनाथ आवळे, सनीभाई ननावरे, ऋषिकेश वायदंडे, शरद केंगार, उद्धाव कर्णे, हिंदुराव सोनवणे, संतोष फडतरे, आबा चव्हाण, विश्वदीप कांबळे उपस्थित होते. शिवाजीराव भिसे यांनी प्रास्तविक केले. दिलीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण संकपाळ यांनी आभार मानले.