शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लँचेट’च्या चर्चेमुळे ‘अंनिस’ अस्वस्थ

By admin | Updated: July 9, 2014 00:02 IST

पुणे पोलिसांचा प्रयोग : सखोल चौकशीची मागणी पोलीस महासंचालकांकडे करणार

सातारा : ज्यांनी आयुष्यभर आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांना विरोध केला, त्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करण्यासाठी ‘प्लँचेट’सारख्या अंधश्रद्धेचा वापर केल्याचा आरोप होत असेल, तर तो अत्यंत गंभीर आहे. गृहखात्याने तितक्याच गांभीर्याने त्याची दखल घ्यावी आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलीस महासंचालकांकडे करणार आहे.अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गेल्या वर्षी २० आॅगस्ट रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दहा महिने उलटूनही मारेकऱ्यांपर्यंत पोचण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. आता या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, या तपासासाठी ‘प्लँचेट’ करून डॉ. दाभोलकर यांच्याच आत्म्याला पाचारण करण्यात आले आणि तपासाची दिशा ठरविण्यात आली, असा आरोप करणारा वृत्तांत एका नियतकालिकात प्रसिद्ध झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी तातडीने हा आरोप फेटाळला आहे. मात्र, या आरोपाची शहानिशा होऊन सत्य महाराष्ट्रासमोर आले पाहिजे, अशी भूमिका ‘अंनिस’ने घेतली आहे.यासंदर्भात प्रतिक्रिया देताना डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जीवनपट आणि त्यांचे विचार सर्वांनाच माहीत आहेत. अशा व्यक्तीच्या हत्येचा तपास वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या अधिकाऱ्यानेच केला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. दहा महिने होऊन गेले तरी मारेकरी अद्याप हाती लागत नाहीत, यामुळे लोकांमध्ये आधीच असंतोष आहे. त्यातच तपास करण्यासाठी ‘प्लँचेट’सारख्या जादूटोण्याचा वापर केल्याचा आरोप होत असेल, तर तो अत्यंत गंभीर आहे.’‘यासंदर्भात प्रसिद्ध झालेला वृत्तांत वाचताना असा प्रकार घडल्याची चर्चा आधीपासूनच होती असा उल्लेख आढळला. अवघड तपासात मंत्रतंत्रांचा वापर पोलिसांकडून केला जातो, हे उघड गुपित आहे. त्यामुळेच अशा आरोपाची तातडीने शहानिशा होणे गरजेचे आहे. पोलीस महासंचालकांची वेळ घेण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यांना निवेदन सादर करणार आहोत,’ असे डॉ. हमीद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)