शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

चारा-पाण्याअभावी जनावरांची पोटं खपाटाला

By admin | Updated: April 12, 2016 00:43 IST

माण तालुक्यातील चित्र : पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही चारा छावण्या सुरु नाहीत

म्हसवड : माण तालुक्यातील काही भागात प्रचंड चारा-पाणीटंचाई जाणवू लागली आहे. चारापाण्याअभावी जनावरांचे मोठे हाल होत आहेत. जनावरं जगविण्यासाठी पशुपालकांची धडपड सुरू आहे. ओला चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. जनावरांची पोटं खपाटाला चालली आहेत. पालकमंत्र्यांनी मागणीनुसार चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश देऊनही चारा छावण्या सुरू होत नाहीत. त्यामुळे पुढील दोन महिने जनावरे कशी जगवायची, हा प्रश्न पशुपालकांसमोर आहे.माण तहसील कार्यालयाकडे जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याचे प्रस्ताव गेल्या एक महिन्यापासून धूळखात पडून आहेत. या प्रस्तावावर लक्ष देण्यास प्रशासनाकडे वेळ नाही. पालकमंत्र्यांनी डीपीडीसीच्या बैठकीत दुष्काळी भागातून चारा छावणी मागणीचे प्रस्ताव आल्यास चारा छावण्या सुरू कराव्यात असे जाहीर करून अनेक दिवस उलटले तरी माणमध्ये अद्याप चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. प्रशासनाने तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)दुष्काळ निवारणाच्या सुविधा कधी मिळणार?शासनाने माण तालुक्यातील १०६ गावे दुष्काळी जाहीर केली खरी; पण नागरिकांना दुष्काळ निवारणाच्या सुविधा मात्र अद्याप सुरू केल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले, पण हाताला रोजगार, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. शिंगणापूर पाणीयोजना तातडीने सुरू केल्यास तालुक्यातील निम्म्या भागाचा पाणीप्रश्न सुटेल.३९ टँकरच्या मदतीने दुष्काळाशी लढासध्या माण तालुक्यातील उत्तर भागात शेतकरी दुष्काळाशी मुकाबला देत आहेत. तालुक्यातील ५६ हजार ४०५ नागरिक, ८९ हजार ३७४ जनावरे ३९ टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहेत. माणच्या पूर्व व उत्तर भागात पाच दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. त्यामुळे यापुढील काळात जनावरांना पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध न झाल्यास जनावरे विकण्याशिवाय पर्याय उरणार नाही.