शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

अंगारकीचा चंद्रोदय नवविचारांचा!

By admin | Updated: July 16, 2014 01:22 IST

विविधांगी प्रबोधन : खिंडीतील गणपती देवस्थानात भक्तांना समजले शाडूमूर्तीचे महत्त्व

सातारा : अंगारकी चतुर्थीनिमित्त खिंडीतील गणपतीच्या मंदिराकडे नेहमीप्रमाणे हजारो भक्तांची पावले वळली. परंतु या अंगारकीला श्रींच्या दर्शनाबरोबरच भक्तांना मिळत होते पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील आपल्या जबाबदारीचे भान. उपवास सोडण्यापूर्वी भक्तांनी चंद्रदर्शनही घेतले; मात्र आजचा चंद्रोदय त्यांना नवविचार देणारा ठरला.मंगळवार तळ्यात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, यावर्षी ‘लोकमत’सह विविध व्यक्ती, संस्था, मंडळे आणि सातारा पालिकाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आग्रह धरून तसा विचार रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मंगळवार तळे मित्रसमूह हा त्यातीलच एक जनसमूह. गणेशोत्सव सुरू होण्याच्या सुमारे एक महिना आधी आलेल्या अंगारकी चतुर्थीचा याकामी उपयोग करून घेण्याचे या मंडळींनी ठरविले. अंगारकीला खिंडीतील गणपती देवस्थानला सुमारे चार ते पाच हजार भाविक दर्शनासाठी येतात. या पायरी मार्गावर मंडळींनी मातीच्या गणपतीचे आणि पर्यावरणाचे महत्त्व सांगणारे बारा फलक लावले. प्रदक्षिणामार्गावरही चार फलक उभे केले.‘यंदा बाप्पा शाडूचाच आणणार, विसर्जनही घरीच करणार, निर्माल्याचे खत बनविणार, आपला परिसर सुंदर बनविणार’, ‘करूया स्वागत इको फ्रेन्डली गणेशाचे, करूया निर्मूलन प्रदूषणाचे, वैभव जपूया साताऱ्याचे’, तसेच ‘प्लास्टर आॅफ पॅरिस नको की रासायनिक घातकी रंग नको, आयुष्याला प्रदूषणाचा फास नको,’ असे संदेश या फलकांवर झळकत होते. सायंकाळी भक्तांची संख्या वाढली. त्यावेळी कार्यकर्ते पायरीमार्गावर उभे राहिले. ‘केवळ संकल्प नाही, आहे दृढनिर्धार’ असे शीर्षक असणारी सुमारे हजार पत्रके त्यांनी भक्तांना वाटली.मंगळवार तळे मित्रसमूहाचे राजेश माने, नंदकुमार देवरुखकर, जितेंद्र भिसे आणि इतर सुमारे पंचवीस कार्यकर्ते घरोघर जाऊन यासंबंधी प्रबोधन करीत आहेत. आतापर्यंत ते तळे परिसरातील १६ अपार्टमेंट््ससह सातशे घरांमध्ये पोहोचले आहेत. (प्रतिनिधी)