सातारा : लायन्स क्लब ऑफ सातारा एमआयडीसीच्या अध्यक्षपदी आनंदा गायकवाड यांची तसेच प्रसाद देशमुख यांची सेक्रेटरीपदी, कुलदीप मोहिते यांची खजिनदारपदी व प्रथम उपाध्यक्षपदी बाळासाहेब महामुलकर यांची निवड झाली.
समाजसेवा करण्यासाठी अग्रगण्य असलेला कोविड महासंकटात १६ ऑक्सिजन मशीन क्लबच्या माध्यमातून उपलब्ध करून कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचे काम केलेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनलचे अनेक पुरस्कार प्राप्त लायन्स क्लब ऑफ सातारा एमआयडीसीच्या सन २०२१-२२ च्या कार्यकारिणीची नुकतीच निवड झाली.
याप्रसंगी बोलताना सन २०२१- २२ मध्ये क्लबच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे हाती घेतले जातील अशी ग्वाही नूतन अध्यक्ष आनंद गायकवाड यांनी दिली. यावेळी रिजन चेअरमन शिवाजीराव फडतरे, धैर्यशील भोसले, राजेंद्र मोहिते, डी. वाय. पाटील, संजोग मोहिते, श्रीकांत तोडकर, केतन कोटणीस, लोकेश उत्तेकर, सचिन साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीचे अनेक मान्यवरांनी तसेच लायन्स क्लब ऑफ सातारा एमआयडीसीच्या सर्व सदस्यांनी कौतुक केले.
चार आयकार्ड फोटो आहेत