शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अजब व्यवहार! ‘तो’ पैसे मागत गेला, ‘हा’ मागेल तेवढे देत गेला; पावणे दोन लाखांना गंडा

By दत्ता यादव | Updated: August 28, 2023 21:07 IST

आयफोन २५ हजारांचा; प्रशिक्षित अभियंत्याने दिले पावणेदोन लाख

सातारा : केवळ २५ हजारांत आयफोन विकत मिळत असल्याने एका अभियंत्याने हा फोन खरेदीसाठी तब्बल पावणेदोन लाख रुपये गमावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्वजित युवराज कदम (वय २१, रा. कांगा कॉलनी, सदर बझार, सातारा) हा साताऱ्यातील एका महाविद्यालयात मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. काही दिवसांपूर्वी ओएलएक्सवर २५ हजारांत आयफोन विकायचा असल्याची जाहिरात त्याने पाहिली. त्या व्यक्तीने आपण आर्मी ऑफिसर असल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे त्याचा विश्वास बसला.

सुरुवातीला विश्वजित कदम याने त्याला पाच हजार रुपये पाठविले. त्यानंतर २० हजार पाठवले. मात्र, संबंधित व्यक्तीने चुकीचे ट्रान्झेक्शन झाले असून, हे रद्द करण्यासाठी आणखी ४० हजार रुपये पाठवा, असे सांगितले. तो आर्मी ऑफिसर जसे सांगत गेला तसे विश्वजित त्याचे ऐकत गेला. कधी ३० तर कधी ४० हजार असे करत त्याने २ लाख ९२ हजार ४१९ रुपये त्या व्यक्तीला ऑनलाइन पाठवले. २५ हजारांचा मोबाइल खरेदी करायला गेलेल्या विश्वजित कदम याने जवळपास पावणेदोन लाख रुपये त्याला दिले. असे असतानाही त्याची आणखी मागणी वाढत गेल्याने कदम याला अखेर जाग आली. त्यानंतर त्याने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.२५ हजारांच्या मोबाइलसाठी आपण एवढे पैसे देतोय, याची जरा सुद्धा त्याच्या मनात शंका कशी आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून, हे नेमके प्रकरण काय आहे, याचा तपास आता सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार पोळ हे करीत आहेत.

स्वत:सोबत पाच मित्रही फसले.

विश्वजित कदम याने स्वत:चे १ लाख १२ हजार रुपये आयफोनसाठी त्या आर्मी ऑफिसरला दिले. मात्र, उर्वरित पैसे हे त्याने त्याच्या पाच मित्रांना देण्यास सांगितले. त्या मित्रांनीही विश्वजितवर विश्वास ठेवून त्या व्यक्तीच्या मोबाइलवर ऑनलाइन पैसे पाठवले. सुशिक्षित शिक्षण घेणारी मुले अशाप्रकारे फसवणुकीला बळी पडल्याने पोलिसांकडूनही आश्चर्य व्यक्त होत आहे.