शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

‘ब्युटिफुल साताऱ्या’त अखेर अमिताभ बच्चन येणार!

By admin | Updated: March 31, 2016 00:08 IST

शहेनशहा’ला भेटले ‘राजे’ : एकाच स्फटिकापासून तयार केलेली शाही तलवार दिली भेट

सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून सातारकरांना ज्याची प्रतीक्षा होती, ती आता पूर्ण होणार आहे. छत्रपती घराण्याचा ‘शिवसन्मान’ हा मानाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांनी साताऱ्यात येण्याचा शब्द दिला आहे. कला क्षेत्रातील या ‘शहेनशहा’ला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी याबाबतचे अधिकृत निमंत्रणही दिले.मुंबईच्या जुहू येथील ‘जलसा’जवळील ‘जनक’ या दुसऱ्या बंगल्यात उदयनराजे यांनी अमिताभ यांची भेट घेतली. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले फाउंडेशन आॅफ कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटी आणि पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमी आयोजित ‘सातारा गौरव पुरस्कार’ अंतर्गत देण्यात येणाऱ्या ‘शिवसन्मान’ची माहिती दिली गेली. यावेळी एका स्फटिकापासून तयार करण्यात आलेली भव्य ‘शाही तलवार’ उदयनराजे यांनी अमिताभ यांना भेट दिली. यावेळी अमिताभ यांनीही त्यांना हरिवंशराय बच्चन यांच्या काव्यसंग्रहाची भेट दिली. यावेळी पंकज चव्हाण, नाशिकचे धनंजय पाटील, अमरसिंग जाधवराव, अशोक सावंत व शेखर घोरपडे उपस्थित होते. सातारकरांना सोडण्यासाठी अमिताभ फाटकापर्यंत...उदयनराजेंसोबत झालेल्या बराच काळ चर्चेत अमिताभ बच्चन यांनी साताऱ्याच्या सौंदर्याचा उल्लेख केला. ‘सातारा बहोतही ब्युटिफुल स्पेस है... वहाँ मुझे जरुर आना है,’ या शब्दांत त्यांनी अनेकवेळा साताऱ्याचं मनापासून कौतुक केलं. उदयनराजे अन् त्यांचे सहकारी जेव्हा ‘जनक’ बंगल्यात गेले, तेव्हा त्यांच्या स्वागताला अमिताभ खाली आले होते. त्यानंतर बाहेर पडतानाही अमिताभ फाटकापर्यंत आले. त्यांचे हे विनयशील आदरातिथ्य पाहून भारावलेल्या उदयनराजेंनी त्यांच्यासमोर गाडीत न बसण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अमिताभ यांनी मोठ्या हक्कानं ‘अगर आप गाडी में नही बैठेंगे तो मैं बंगले का गेटही नही खोलूंगा,’ असं दिलखुलासपणे हसत सांगताच उदयनराजे अखेर गाडीत बसले.