शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पाटणमध्ये आमसभा पडद्याआड; मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्याची भीती

By admin | Updated: March 3, 2015 00:48 IST

मागच्या खेपेस आमसभेचे नियोजन पाटणच्या बचत गटामध्ये केले. मात्र, सभा सुरू होतानाच देसाई-पाटणकर गट हातघाईवर आला.

पाटण : जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी वर्षातून एकदा आमसभेचे नियोजन असते. मात्र, पाटणला ग्रामसभा घ्यायची म्हणजे मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्याचा अनुभव २००५ साली येथील जनतेला आला. तेव्हापासून आजअखेर आमसभेचे नाव घ्यायला कुणी तयार नाही. त्यामुळेच आमसभेचा अपवाद पाटण तालुक्याला असून, आमसभेचे नियोजन करावे किंवा करू नये यातूनच जणू तालुका वगळला की काय, अशी चर्चा जनतेत सुरू आहे. आम जनतेचे प्रश्न आमदार, खासदार व गावकऱ्यांनी ऐकावेत यासाठी पंचायत समितीने आमसभेचे नियोजन करण्याचे असते. पण, त्याचं असं झालयं की, मागच्या खेपेस आमसभेचे नियोजन पाटणच्या बचत गटामध्ये केले. मात्र, सभा सुरू होतानाच देसाई-पाटणकर गट हातघाईवर आला. त्यांची भांडणं सोडविण्यासाठी त्यावेळच्या लोकप्रतिनिधींना व पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. तेव्हापासून आमसभेचे नाव काढायला कुणीही तयार नाही. सध्या पाटणची आमदारकी शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. तर पाटण पंचायत समितीचे सभापतीपद माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाच्या ताब्यात आहे. त्यामुळेच पाटणची आमसभा होईलच याची शाश्वती नाही. २००५ साली देखील आमदार देसाई व पंचायत समितीचे सभापती सत्यजित पाटणकर अशी स्थिती होती. त्या दरम्यान आमसभा बोलविली गेली; मात्र जनहिताचे प्रश्न बाजूला राहिले आणि आमसभेचा आखाडा झाला. (वार्ताहर)चांगला संदेश जाईल...आमसभा झालीच पाहिजे, अशी सक्ती नसली तरी लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीत आमसभा होते. हे प्रतिष्ठेचे आणि कार्यत्परतेचे लक्षणे मानले जाते. त्यामुळे यापुढे पाटणची आमसभा आयोजित झाल्यास तालुक्यातील जनतेमध्ये एक चांगला संदेश पोहोचेल.