शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रुग्णवाहिका आजारी!

By admin | Updated: December 9, 2014 23:25 IST

फलटण पंचायत समिती सभा : प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विषय ऐरणीवर

फलटण : प्राथमिक आरोग्य केंद्र तरडगाव व बरड येथील वीज बील आणि रुग्ण वाहिकेच्या इंधनासाठी अनुदान उपलब्ध होत नसल्याने येणाऱ्या अडचणींचा मुद्दा सभापती स्मिता सांगळे यांनी उपस्थित केला. या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर जवळपास सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका इंधन, वीज बील, दूरध्वनी बील, स्टेशनरी वगैरेसाठी अत्यल्प अनुदान उपलब्ध होत असल्याचे समोर आले.फलटण पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा सभापती स्मिता सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात झाली. यावेळी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील या सुविधा सुरु ठेवण्यात पुरेशा अनुदाना अभावी अडचण येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या विषयाबाबत जिल्हा परिषदेकडील संबंधीत विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली. त्यावेळी यावर्षी या सर्व खर्चासाठी अद्याप अनुदान उपलब्ध झाले नसल्याने या अत्यावश्यक सेवा अन्य मार्गाने खर्च करुन सुरु ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांना याााात योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. पोटे यांनी आरोग्य विभागाचा आढावा सादर करताना तालुक्यामध्ये डेंग्यूचे ८ रुग्ण आढळून आले होते त्यांना उपचार करुन घरी पाठविण्यात आल्याचे सभागृहात सांगितले. सामाजिक वनीकरण विभागामार्फत फलटण-दहिवडी रस्त्यावर झिरपवाडी ते दुधेबावी दरम्यान लावण्यात आलेल्या झाडांना संरक्षक जाळी व पाणी घालण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता असताना यंत्रणा जागरुकतेने लक्ष देत नाही. या गोष्टी यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिली असताना त्याबाबत योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचे धनंजय साळुंखे यांनी सांगितले.तरडगाव ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेच्या खोल्या वेणुताई चव्हाण हायस्कूलसाठी उपलध करुन देण्याबाबत ठरावाद्वारे मान्यता देण्यात आली होती. मात्र, जिल्हा परिषदेने अशा पध्दतीने प्रा. शाळेच्या खोल्या हायस्कूलसाठी उपलध करुन न देण्याचे निर्देश दिले असे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी निदर्शनास आणून दिले. ग्रामपंचायत विभागाच्या आढाव्या दरम्यान दलितवस्ती सुधारणा योजनेंतर्गत कामासाठी असलेली लोकसंख्येची अट १० पर्यंत कमी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जुन्या अपूर्ण घरकुलांच्या कामाबाबत योग्य निर्णय घेवून त्याची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची मागणी धनंजय साळुंखे पाटील यांनी केली. निवडणूक कामकाज व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील बैठकांमुळे मागील दोन मासिक बैठकांना उपस्थित राहता आले नसल्याचे सांगत सध्या श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयात सुरु असलेल्या विज्ञान प्रदर्शनास भेट देण्याची विनंती गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी पंचायत समिती सदस्यांना केली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम, कृषी, एसटी महामंडळ, वीज वितरण व अन्य खात्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर सभेचे कामकाज सुरु असताना काही जण मोबाईलवर व आपापसात बोलत असतात तसेच आढाव्याचेवेळी मागील बैठकीत दिलेल्या सूचनांबाबत काय कार्यवाही केली याची माहिती दिली जात नसल्याचे निदर्शनास देत यापुढे असे प्रकार घडू नयेत अशी मागणी धनंजय साळुंखे (पाटील) यांनी केली. तावडी ता. फलटण येथील प्रा. शाळेतील विद्यार्थिनींनी विभागीय स्पर्धेत ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्यााद्दल या विद्यार्थिनींचा सभागृहात सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सभेत शेवटी वैशाली गावडे यांनी समारोप करुन आभार मानले. (प्रतिनिधी)दलितवस्तीतील काम रद्दसावंतवाडी, मिरेवाडी, शेरेचीवाडी (ढवळ) येथे पुरेशी वस्ती नसल्यामुळे दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर झालेली कामे रद्द करण्यात आल्याचे तसेच मागील मासिकसभेत सुरवडी-साखरवाडी रस्त्याच्या साईडपट्टयांचा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. बस चालवताना मोबाईल नकोबस चालविताना चालक मोबाईलवर बोलताना आढळल्यास त्यांच्याविरुध्द योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन एसटीच्या अधिकाऱ्यांनी या सभेत दिले. वरील प्रश्नांबाबत संबंधित विभागांनी योग्य खबरदारी घेवून असे प्रश्न उपस्थित होणार नाहीत यासाठी समन्वयाने योग्य उपाययोजना कराव्यात अशा सूचना उपसभापती पुष्पाताई सस्ते यांनी केली. वनक्षेत्रपाल गेल्या चार बैठकापासून पंचायत समिती मासिक सभांना उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आणून देताच त्याबाबत संबंधीतांना लेखी सूचना देण्याचे आदेश देण्यात आले. फलटण-दहिवडी रस्त्यावर झिरपवाडी ते दुधेबावी दरम्यान लावण्यात आलेल्या झाडांची योग्य काळजी घेतली जात नाही, एसटी बसचालक गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत असल्याने भीषण अपघाताची शक्यता व्यक्त करीत त्याबाबत योग्य सूचना देण्याची गरज आहे. तसेच शेती पंपाच्या वीज पुरवठ्याबाबत लोड शेडींगचे रोटेशन बदलण्यात यावे.- धनंजय साळुंखे, पंचायत समिती सदस्य