शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्ब्युलन्स नेली सहलीला!

By admin | Updated: October 11, 2015 00:08 IST

पाटणच्या आरोग्य अधिकाऱ्यांचा प्रताप : कास पठारावर म्हणे दर्शनाला गेलो होतो

अरुण पवार / पाटण पाटण ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक व कर्मचारी यांच्यातील गजब कहाण्यांचे अजब कारनामे दिवसेंदिवस समोर येत असून, शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयाची सहल चक्क कास पठाराच्या दर्शनाला गेल्याचे उघड झाले आहे. मग कास पठार बघायचे झाल्यास खिशाला चाट नको म्हणून रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला. पाटण ग्रामीण रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधीक्षक विरुद्ध कर्मचारी असे युद्ध सुरू आहे. मग वैद्यकीय अधीक्षक हटावसाठी कर्मचाऱ्यांनी उपोषणे, वरिष्ठ स्तरावर तक्रारी केल्या, त्याची चौकशीही झाली. असे असताना रुग्णवाहिकेतून कास पठाराचे दर्शन घेणे या नियमबाह्य आणि धाडसी मोहिमेचे बिंग फुटणार याची वैद्यकीय अधीक्षक यांना साधी जाणीव होऊ नये. त्याहीपुढे जाऊन काही ठराविक कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कास पठाराची चढाई केली. तर उर्वरित कर्मचारी आपले पाय ओढल्याशिवाय राहतील का? बरं असो; परंतु रुग्णवाहिका ही फक्त आणि फक्त रुग्णांची ने-आण करण्यासाठीच वापरायची असते. त्वरित सेवेसाठी रुग्णवाहिकेला जाईल तिथे वाट करून दिली जाते. मग काही रुग्णवाहिका कास पठारावर गेल्यावर तेथील पर्यटकांनी तोंडात बोटे घातली नसतील तर नवलच. दुसरीकडे पाटण ग्रामीण रुग्णालयात मेंढोशी येथील एक अत्यवस्थ रुग्ण पुढील उपचारााठी तडफडत होता. त्यास पुणे येथे हलविण्यासाठी रुग्णवाहिका हवी होती आणि दुसरीकडे कास पठाराची भ्रमंती करण्यास रुग्णवाहिकेचा झालेला वापर ही बाब निश्चित संवेदनशील असून, कास पठाराची सहल पाटण ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थापनात महागात पडणार असे दिसते. कारण या सहलीचे प्रत्यक्ष साक्षीदारच भंडाफोड करण्याची शक्यता आहे.