शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

शहरात आंबेडकरप्रेमींचा मोर्चा

By admin | Updated: June 10, 2014 02:15 IST

साताऱ्यात कडकडीत बंद : दोन ठिकाणी किरकोळ बाचाबाची

सातारा : आंबेडकरप्रेमींनी साताऱ्यात पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असलातरी ‘रिपाइं’चे तीन स्वतंत्र निषेध मोर्चे निघाले. काही ठिकाणी किरकोळ बाचाबाचीचेही प्रकार घडले. मात्र, प्रमुख कार्यकर्त्यांनी सावरून घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अनेक ठिकाणी सामुदायिक बुध्दवंदना घेण्याबरोबरच मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून महापुरुषांची अवमानकारक छायाचित्रे पोस्ट केल्यानंतर त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. सातारा शहरातही सोमवारी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात ‘रिपाइं’चे तीन निषेध मोर्चे निघाले आणि त्यांची सांगता मातोश्री भीमाबाई आंबेडकर स्मारकास अभिवादन करून झाली. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशारे तपासे, नवनाथ शिंदे, अण्णा वायदंडे, सचिन वायदंडे, अजिंक्य तपासे, मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नऊ वाजता आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले आणि निषेध मोर्चाला सुरूवात केली. हा मोर्चा राजपथमार्गे राजवाडा आणि येथून खालच्या रस्त्याने पोवईनाका मार्गे सदर बझार येथे आला. साडेदहाच्या दरम्यान ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शरद गायकवाड, वैभव गायकवाड, नंदू जावळे आणि सहकाऱ्यांचा निषेध मोर्चा आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून सुरू झाला. तपासे आणि गायकवाड यांचा निषेध मोर्चा सुरू असताना ‘रिपाइं’चे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, मदन खंकाळ, विशाल डोकेफोडे, विलास कांबळे, जय रणदिवे, सिध्दू सणगीर, अनिल कांबळे, दत्तू ओव्हाळ, महादेव कांबळे आणि सहकाऱ्यांनी बाँबे रेस्टॉरंट येथून निषेध मोर्चा सुरू केला. आंबेडकर पुतळा परिसरात आल्यानंतर येथे अभिवादन झाले आणि मोर्चा पुढे निघाला आणि मातोश्री भीमाबाई आंबेडकर स्मारक येथे सांगता झाली. सातारा बसस्थानक परिसरात असणाऱ्या मंडईत एका व्यापाऱ्याने आपला व्यवसाय सुरू ठेवला होता. याचवेळी येथून जाणाऱ्या आंबेडकरप्रेमी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तेथे धाव घेत वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यात विविध ठिकाणी शांततेत बंद पाळला. तरडगावमध्ये बंद तरडगाव, ता. फलटण येथे या घटनेच्या निषेधार्थ दुपारपर्यंत बंद पाळण्यात आला. या बंदला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमवारी आठवडी बाजार असतो. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी दुपारपर्यंतच बंद पाळण्यात आला. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वरकुटे-मलवडी येथे निषेध फेरी वरकुटे-मलवडी : आक्षेपार्ह छायाचित्राच्या निषेधार्थ वरकुटे-मलवडी येथे ग्रामस्थ व सर्व संघटनांच्या वतीने गावातून शांततेच्या मार्गाने निषेध फेरी काढून बंद पाळण्यात आला. यावेळी बापूराव बनगर, रवींद्र आटपाडकर, दादासाहेब काळेल यांनी मनोगत व्यक्त केले. दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रा. दीपक जगताप, विवेक आटपाडकर यांनी केली. निषेध फेरीत भारत बनसोडे, अशोक केंगार, बाबासाहेब मंडले, महावीर काटकर, दत्ता चव्हाण, शंकर तोरणे, दत्ता बनसोडे, बापू बनसोडे, संजय चव्हाण, सुभाष जगताप, बाबा सरतापे, अमोल यादव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)