शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

आंबेडकरप्रेमींनी दाखविला संयम

By admin | Updated: June 9, 2014 01:16 IST

सातारा जिल्हा : सोशल मीडियावर पुन्हा महापुरुषाचा अवमान, ठिकठिकाणी निषेध

सातारा : सोशल मीडियावर पुन्हा एकदा महापुरुषाचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकून अवमान केल्याचा प्रकार घडला. या घटनेचे पडसाद रविवारी जिल्ह्यात उमटले. सातारा, कोरेगाव, वडूज, फलटण, जावळी, कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर येथे आंबेडकरप्रेमींनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. तसेच अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला.सातारा शहरात ‘रिपाइं’च्या वतीने निषेध फेरी काढली. यामध्ये दादासाहेब ओव्हाळ, पार्थ पोळके, चंद्रकांत खंडाईत, दयानंद माने, प्रवीण धस्के, संदीप कांबळे, नीलेश भिसे तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोवई नाका येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला.सातारा शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजीव मुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी राजीव मुटाणे व रवींद्र पिसाळ यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, सोमवारी सातारा बंद करणार असून या बंदला प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले. या बैठकीस किशोर तपासे, संदीप शिंदे, नवनाथ शिंदे, नेताजी इंगवले, विकास बुरुंगले, रवींद्र बाबर, संजय शिंदे, बाबा शिंदे, आशिष पोळ, धनेश खुडे, अशोक गायकवाड, शरद गायकवाड उपस्थित होते.दहिवडीत कडकडीत बंददहिवडी : या घटनेच्या निषेधार्थ दहिवडी येथे शांततापूर्ण वातावरणात कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दिवसभर दुकाने बंद ठेवून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.वडूज येथे मूक मोर्चावडूज : महापुरुषाच्या अवमानप्रकरणी खटाव तालुका ‘आरपीआय’च्या वतीने शहरातून मूक मोर्चा काढून निवासी नायब तहसीलदार एम. के. बेबले यांना संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अजित नलावडे कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी शरद गायकवाड, सुनील मिसाळ, कृणाल गडांकुश, निखिल खरात, रवींद्र झेंडे, देवानंद मिसाळ, राहुल सातपुते, उज्ज्वला मिसाळ, मुक्ताबाई मिसाळ, महेंद्र रायबोले, शंकर वायदंडे, किसन मिसाळ, अजित रायबोले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. तरडगावमध्ये आज बंदतरडगाव : या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत तरडगावमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये सर्व व्यापारी वर्ग, दुकानदार यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले. (प्रतिनिधी)