शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

आमिरी पाहुणचार... संतापले आमदार !

By admin | Updated: April 17, 2016 23:31 IST

प्रशासनाच्या भूमिकेवर हल्लाबोल : कार्पोरेट दुष्काळ हटाव मोहीम नंतर राबवा... अगोदर तहानलेल्या गावांना टँकर अन् छावण्या पुरवा

सातारा : ‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी रविवारी साताऱ्यात आलेल्या अभिनेता आमीर खानचा खासगी दौरा जिल्ह्यात भलताच वादग्रस्त ठरला. सुटीच्या दिवशी अख्खं प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयात आमीरच्या दिमतीला आलेलं पाहून चिडलेल्या स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. रविवारी साताऱ्यात आमीरनं दुष्काळी भागातील ‘वॉटर कप’ स्पर्धेवर चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र, बैठकीला आमीर खान असणार आहे, हे शेवटपर्यंत संबंधितांना वरिष्ठांनी कळू दिले नव्हते. सकाळी हेलिकॉप्टरने सैनिक स्कूलच्या मैदानावर उतरल्यानंतर आमीर थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच रवाना झाले. याठिकाणी कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी ठेवला होता. काहीजण आपले ओळखपत्र पोलिसांना दाखवून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलिसांकडून संबंधितांना ‘तुम्ही कोणीही असा; पण आतमध्ये तुम्हाला सोडले जाणार नाही. कलेक्टरांचा सक्त आदेश आहे. वाटल्यास तुम्ही त्यांना फोन करा. तरच आतमध्ये सोडतो,’ अशी मजेशीर उत्तरे मिळत होती. आमच्या गावातही जलसंधारणाची कामे व्हावीत, यासाठी मी आमीर खानची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे शिरवळ येथील दादा भोसले यांनी सांगितले. मात्र, त्यांनाही पोलिसांनी आतमध्ये सोडले नाही. दरम्यान, प्रशासनाच्या भूमिकेबद्दल लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. ‘जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करायला ज्यांना अनेक दिवस लागतात. दुष्काळी भागात विंधन विहिरी मंजूर करायला, ज्यांना दोन-दोन महिने लागतात, अशी अधिकारी मंडळी सुटीच्या दिवशीही मोठ्या उत्साहाने एका सेलिब्रिटीच्या खासगी बैठकीला सरकारी कार्यालयात आवर्जून उपस्थित राहतात, हे मात्र, धक्कादायक आहे,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे अन् काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला टार्गेट केले. ‘दुष्काळावर मात करत असल्याची ‘कार्पोरेट शो’ बाजी बंद करा अन् अगोदर दुष्काळग्रस्तांसाठी मूलभूत गरज असलेल्या टँकर, छावण्यांचे प्रस्ताव मंजूर करा,’ अशा भाषेतही दोन्ही काँग्रेसचे आमदारही जिल्ह्यातील प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्तपणे तुटून पडले. (प्रतिनिधी)मोबाईल बंदी असतानाही फोटो !आमीर खानची ही बैठक नियोजित होती. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. मात्र येताना कोणीही आतमध्ये मोबाईल घेऊन यायचा नाही, अशा सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काहीजणांनी बैठकीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेच.लोकप्रतिनिधींना टाळून कसा हटणार दुष्काळ ?ज्या दुष्काळी भागाचा कायापालट करण्यासाठी आम्ही आयुष्यभर संघर्ष करत आलो, त्या गावांसाठी आमीर खानसारखा एखादा अभिनेता जिल्ह्यात येत असेल तर त्याला आमची कधीच हरकत असणार नाही. मात्र, आमच्या जिल्ह्यातील एवढ्या महत्त्वाच्या उपक्रमाबाबतच्या मिटिंगची साधी माहितीही प्रशासन जर लोकप्रतिनिधींना कळवत नसेल तर मात्र, खूप संतापजनक आहे. असे अनेक सेलिब्रिटी एक दिवसासाठी येतील अन् जातील, त्यामुळे या अशा लोकांच्या ताटाखालचे मांजर व्हायचे का, याचा विचार प्रशासनाने करावा, अशा भाषेत आमदार जयकुमार गोरे यांनी संताप व्यक्त केला.आमीर खानच्या वैयक्तिक संस्थेची ही खासगी बैठक असेल तर तो त्याचा विषय आहे. मात्र, सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत ही बैठक गुपचूपपणे घेतली जात असेल तर मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून याचा जाब विचारावाच लागेल, असे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. ‘अलिकडे काही अभिनेत्यांना सातारा जिल्ह्यात आणून त्यांच्यासोबत स्वत:ची टिमकी वाजवून घेणाऱ्या स्वयंघोषित जलतज्ञाची चमकोगिरी आता थांबवलीच पाहिजे,’ अशा खरमरीत भाषेतही जयकुमार गोरे यांनी साताऱ्याच्या एका डॉक्टरला फटकारले. ‘सरकारी पुरस्कारासाठी धडपडू पाहणाऱ्या या स्वयंघोषित समाजसेवकाने अजिंक्यताऱ्यावरची व्हिडिओ क्लिप ज्या पद्धतीने फिरविली आहे, ते पाहता भविष्यात जिल्ह्यातील दुष्काळ मीच हटविला, अशी शेखी मिरवायलाही ते मागे पुढे पाहणार नाहीत,’ अशीही भीती गोरे यांनी व्यक्त केली.