शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासाहेबांबरोबरच ग्रामस्थांच्याही हाती लेखणी

By admin | Updated: December 26, 2014 00:21 IST

डाटा आॅपरेटर संप : चाळीस दिवसांपासून संगणकावरील दाखले बंद ; जिल्ह्यातील सातशे जण बंदमध्ये

सातारा : गावाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीतील संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) यांनी चाळीस दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या हाती दाखले देण्यासाठी आता लेखणी आली आहे. त्याचबरोबर अनेकवेळा छापील अर्ज घेऊन ग्रामस्थ त्यावर स्वत: लिहित आहेत. त्यानंतर ग्रामसेवकांच्या सह्या घेण्यात येत आहेत. त्यामुळे अण्णासाहेबांच्या बरोबरच ग्रामस्थांच्याही हातातही लेखणी दिसत आहे. ग्रामपंचायत ही गावचा कणा समजली जाते. ग्रामपंचायतीमार्फत गावचा कारभार पाहिला जातो. सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या बरोबरीने ग्रामसेवक गावच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. ग्रामसेवक व सरपंचाकडून काही दाखले देण्यात येतात. शासकीय कामांसाठी हे दाखले महत्त्वाचे असतात. मागील काही वर्षांपर्यंत ग्रामसेवकांनी किंवा त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी हाताने लिहिलेला दाखला चालत होता. मात्र, काही वर्षांपूर्वीपासून ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांच्या जोडीला संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) हे पद निर्माण करण्यात आले. जवळपास राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीत हे पद तयार झाले. त्यामुळे राज्यात आज सुमारे २७ हजार तर सातारा जिल्ह्यात १,०२७ परिचालक कार्यरत आहेत. त्यांना शासन निर्णयानुसार पगार देण्यात येत आहे. मात्र, यामधील सुमारे सातशे परिचालकांनी दि. १२ नोव्हेंबरपासून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. आतापर्यंत संगणकावरून काही सेकंदात दाखल मिळत होता. मात्र, आता या काम बंदमुळे अनेक ग्रामसेवकांना दाखला लिहून देणे भाग पडले आहे. दररोज अनेकजण दाखले मागण्यासाठी येतात. त्याची पूर्तता करता-करता दिवस संपत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांना या काम बंदमुळे इतर कामांपेक्षा दाखला देण्यातच जास्त वेळ द्यावा लागत आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे १५०० ग्रामपंचायती असून, सध्या १ हजार २७ संगणक परिचालक कार्यरत आहेत. जवळपास सर्व तालुक्यातील परिचालकांनी काम बंद केले आहे. त्यामुळे ऐंशी टक्क्यांहून अधिक ठिकाणचे संगणकावरून दाखले देण्याचे काम बंद झाले आहे. शासनाने संगणकावरील दाखलेच गृहित धरण्याचे धोरण आखले आहे. या काम बंदमुळे हस्तलिखित दाखले शासकीय कामांसाठी चालणार का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)१९ प्रकारचे दाखलेग्रामपंचायतीमार्फत १९ प्रकारचे दाखले देण्यात येतात. आॅनलाईन रजिस्टर नोंद करणे, जन्म, मृत्यूचा दाखला देणे, रहिवासी, वर्तणूक, बांधकाम परवाना, दारिद्र्यरेषेखालील दाखला आदी दाखले देण्यात येतात. संगणकावर डाटा तयार असल्यामुळे काही सेकंदात हे दाखले मिळत होते; पण आता हस्तलिखितामुळे खूपच वेळ जात आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणिंना सामोरे जावे लागत आहे.तोकडा पगार...१३ व्या वित्त आयोगातून आठ हजार पाचशे रुपये जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे वर्ग होतात. तेथून संबंधित एका कंपनीकडे हे पैसे जातात. त्यानंतर ती कंपनी संगणक परिचालकांना पगार देते. बारावीवाल्यांना तीन हजार आठशे तर, पदवीधारकांना चार हजार शंभर रुपये देण्यात येतात. त्यामुळे कमी पगार मिळत असल्याचाही आरोप संघटना करीत आहे.आम्ही सर्वांची काळजी करतो. दाखले देण्याची जबाबदारी आम्हीच घेतो. लोकांचे ऐकतो; पण आमची काळजी शासनाला नाही. आमच्या मागण्यांबाबत कोणी ऐकत नाही. म्हणून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला.- प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष संगणक परिचालक संघटना