शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

मानधनातील पैशातून साहित्यांचे वाटप

By admin | Updated: July 19, 2015 23:37 IST

मसूर : ग्रामपंचायत सदस्यांची सामाजिक बांधिलकी

मसूर : ‘मसूर येथील ग्रामपंचायत सदस्या वनिता बर्गे यांनी आपल्या मानधनातील पैशातून मसूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीची इतरांनी प्रेरणा घ्यावी,’ असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे यांनी केले.मसूर, ता. कऱ्हाड येथील प्राथमिक शाळेत दिवंगत आनंदराव चव्हाण, प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वनिता बर्गे यांनी आपल्या मानधनातून केलेल्या शालेय साहित्यवाटपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक दिलीप सावंत, जनार्दन जाधव, मसूर बिटच्या केंद्रप्रमुख शकुंतला साळुंखे, प्रा. कादर पिरजादे, ग्रामपंचायत सदस्य फैजल मोमीन, भाऊसाहेब बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. जगदाळे म्हणाले, ‘दिवंगत चव्हाण दाम्पत्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ ठसा उमटविला होता. काँग्रेस पक्षावर त्यांनी अखेरपर्यंत निष्ठा ठेवली व समाजातील दीनदुबळ्या गरीब गरजूंना सतत मदतीचा हात देणे हा त्यांचा भाव होता. या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन वनिता बर्गे यांनी केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटपातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.’कार्यक्रमास माधुरी शेटे, हेमा देसाई, माया सावंत, वर्षा म्हस्के, छाया कुंभार,शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. रमेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. राजकुंवर बर्गे यांनी आभार मानले. (वार्ताहर)