शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘युती’कडून रिपाइंला वाटाण्याच्याच अक्षता !

By admin | Updated: May 13, 2016 00:15 IST

जिल्हा नियोजन : सदस्यांच्या यादीत ६ धनुष्यबाण, ४ कमळ, १ जागेवर कपबशी

सातारा : जिल्हा नियोजन समितीमधील निमंत्रित सदस्यांच्या यादीमध्ये शिवसेना, भाजप व राष्ट्रीय समाज पक्ष या तीनच पक्षांना संधी देण्यात आली आहे. साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे हे शिवसेनेचे असल्याने त्यांचा या निवडीवर वरचष्मा राहिला. शिवसेनेने ६, भाजपने ४ तर रासप या आपल्या मित्रपक्षाला त्यांनी केवळ १ जागा दिली आहे. युतीच्या या संसारात रिपब्लिकन पक्ष मात्र नियोजन समितीनासून दूरच तिष्ठत राहिला आहे. नियोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्यांच्या नेमणुकीवरून अनेक महिने अहमहिका सुरू होती. मधल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केलेल्या ११ सदस्यांची यादी ‘लिक’ झाली होती. या यादीमध्ये जी नावे होती, त्यापैकी बहुतांश नावे पुढे मुख्यमंत्र्यांकडे गेली होती. मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर त्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केले होते. ही यादी नियोजन विभागाच्या लालफितीत अडकल्याचेही या वृत्तात स्पष्ट करण्यात आले होते. यानंतर अखेर या यादीवर राज्याच्या नियोजन विभागाने शिक्कामोर्तब करून ही यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठविली आहे. शिवसेनेच्या वतीने चंद्रकांत जाधव (तासगाव, ता. सातारा), महेश शिंदे (भुर्इंज, ता. वाई), गणेश रसाळ (म्हसवड, ता. माण), अर्जुन मोहिते (वर्धनगड, ता. खटाव), गोविंदराव शिंदे (राणंद, ता. जावळी), एकनाथ ओंबळे (केडंबे, ता. जावळी) यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपच्या वतीने माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर (मायणी, ता. खटाव), माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील (मलकापूर, ता. कऱ्हाड), पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ. अतुल भोसले (कऱ्हाड), बाळासाहेब खाडे (पळशी, ता. माण) यांची तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेखर गोरे अशी एकूण ११ जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या ११ व्यक्तींची विशेष निमंत्रित म्हणून जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करीत असल्याचे शासन निर्णय पत्रात नमूद करण्यात आले आहे. विशेष निमंत्रित म्हणून करण्यात आलेल्या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत किंवा शासनाकडून या नियुक्त्या रद्द होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल, तोपर्यंत अबाधित राहतील, असेही निर्णय या पत्रात नमूद केले आहेत. नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या निवडीनंतर आता युतीमधील राजकारण पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडीमुळे रिपाइंमध्ये प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे यांनी मित्रपक्ष म्हणून आम्हाला किमान दोन जागा मिळतील, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते, पण तसे झाले नाही. ‘आमच्याशी लग्न केले असले तरी नांदवायला कोणी नेईना,’ अशी भावना जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली होती, तिच भावना सत्यात उतरल्याचे चित्र सध्या असून, पालिका निवडणुकांमध्ये रिपाइं याचा वचपा काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी) राजेंद्र खाडे यांच्या ऐवजी बाळासाहेब खाडेपालकमंत्री विजय शिवतारे यांनी शिफारस केलेल्या यादीमध्ये डॉ. राजेंद्र खाडे यांचे नाव होते, त्यांच्या जागी बाळासाहेब खाडे यांना भाजपच्या वतीने संधी देण्यात आली आहे.