शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘पशुवैद्यकीय’ला सर्पदंश लशीची ‘अ‍ॅलर्जी’ !

By admin | Updated: December 5, 2014 23:37 IST

जनावरे मरताहेत तडफडून : महाराष्ट्रात कुठेच लस नाही म्हणे..!

मणदुरे : सरकारी रूग्णालयामध्ये माणसांसाठी रेबीज तसेच सर्पदंशावरील अँटीस्रेक पेनम लस उपलब्ध आहे़ मात्र एखादे जनावर सर्पदंशाने बाधित असेल तर त्यासाठी सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये सर्पदंशावरील लस महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध नाही़ सर्पदंशाने येराड, ता़ पाटण येथील एका बैलाला नुकताच प्राण गमवावा लागला. या घटनेमुळे हे वास्तव उघड झाले आहे़ पाटण तालुका ह दुर्गम व डोंगराळ भाग आहे़ सर्पदंशाने जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटना येथे घडल्या आहेत़ या आगोदर पाटण येथील ग्रामीण रूग्णालयातून लस मागवून जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत़ मात्र येराड येथील मारूती साळुंखे यांच्या बैलगाडीला जुंपलेल्या बैलांला सर्पदंश झाला़ त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून सर्पदंश झाल्याबद्दल सांगितले़ त्यानंतर तपासणी करताच, यासाठी सर्पदंशावरील लस आवश्यक असल्याचे सांगून स्वत: वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण रूग्णालय गाठले़ मात्र, माणसांसाठीची लस जनावरांसाठी उपयोगी नसल्याचे सांगण्यात आले़ अखेरीस लस उपलब्ध नसल्याने बैलाला प्राण गमवावे लागले़ या घटनेमुळे जनावरांच्या दवाखान्यात लस उपलब्ध करणे गरजेचे बनले आहे़ या आगोदरच्या घटनेत जनावरांना सर्पदंश झाल्यास पाटण येथील ग्रामिण रूग्णालयातून शेतकऱ्यांच्या पत्रानुसार पैसे भरून लस उपलब्ध केली जाऊन जनावरांचे प्राण वाचले होते़ मात्र, सध्या ग्रामीण रूग्णालयातच उपलब्धता कमी झाल्याने लस उपलब्ध होऊ शकली नाही़ पाटणसारख्या दुर्गम भागात ही लस उपलब्ध असणे गरजेचे आहे़ मात्र महाराष्ट्रात कुठेही सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात सर्पदंशावरील तसेच कुत्र्याच्या चावण्यावरील रेबीज लस उपलब्ध नाही़ त्यामुळे ज्यांचे जीवन पशुधनावर अवलंबून आहे अशा अनेक कुटुंबांवर आर्थिक भार पडत असतो़ ही लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे़ (वार्ताहर)सर्व सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये सर्पदंशावरील अ‍ॅन्टी स्रेक पेनम लस उपलब्ध असणे गरजेचे आहे़ सध्या तरी अशी लस महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध नाही़ - डॉ़ एम़ बी़ चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी, पाटण दवाखान्यात लस उपलब्ध नसल्याने बैलाचा मृत्यू झाला. अशी वेळ कोणावरही येऊ नये - मारूती साळुंखे, बैलमालक शेतकरी, येराड पाटण तालुक्यातील पशुधनगायवर्ग - ३२०२६, म्हैसवर्ग - ४९७२४, शेळ्या - ३५६३०, मेंढ्या १२०६१, एकूण - १२०४४१