सातारा : खासदार उदयनराजे अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आदेश येताच सातारा पालिकेतील सर्व नगरसेवक, पदाधिकारी हातात झाडू घेऊन शहरात स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेला शनिवार, दि. २९ रोजी प्रारंभ होत आहे.सातारा पालिकेतर्फे खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी सातारा शहरासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. साथीचे रोग निवारणासाठी संपूर्ण शहर आणि कास तलाव परिसरत स्वच्छ केला जाणार आहे. ही विशेष मोहीम २९ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे आरोग्य सभापती रवींद्र झुटिंग यांनी दिली.उपाययोजना म्हणून नगराध्यक्ष सचिन सारस आणि उपनगराध्यक्षा दिनाज शेख, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे. दररोज सकाळी सात ते अकरा आणि दुपारी दोन ते पाच या वेळेत स्वच्छता केली जाणार आहे. या मोहिमेत सोमवार, दि. १ रोजी कांगा कॉलनी, मिलिंद सोसायटी, म्हाडा कॉलनी. मंगळवार, दि. २ रोजी लक्ष्मी टेकडी, नगरपालिका चाळ. बुधवार, दि. ३ रोजी गोडोली, बागडेवाडा, म्हस्के वस्ती. गुरुवार, दि. ४ रोजी जुना मोटार स्टॅण्ड, मच्छी मार्केट, सोमवार, दि. ८ रोजी नालंदानगर बुधवार पेठ, मंगळवार, दि. ९ रोजी राजलक्ष्मी सिनेमागृहाच्या पाठीमागे, गोरक्षण बोळ परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. बुधवार, दि. १० रोजी मल्हार पेठ, गुरुवार, दि. ११ रोजी मासेवाला ओढा, शुक्रवार, दि. १२ रोजी दस्तगिर कॉलनी, शनिवार, दि. १३ संत कबीर, पोळ वस्ती. सोमवार, दि. १५ रोजी सदाशिव पेठ मंडई, महात्मा फुले मंडई, युनियन मंडई. मंगळवार, दि. १६ रोजी रविवार पेठ, पोवई नाका परिसरात स्वच्छता करण्यात येणार आहे. मोहिमेला शनिवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकापासून प्रारंभ होणार आहे. यामध्ये पालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला असून, पालिकेच्या तीस कर्मचारी आरोग्यदूत म्हणून काम करणार आहेत. मोहीमेत सातारा शहरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)पुतळे परिसराचीही होणार स्वच्छताअभियानात शुक्रवार, दि. ५ रोजी शहरातील सर्व पुतळे व परिसर, बुधवार, दि. १७ रोजी कास तलाव परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. पाठक हॉलमध्ये शनिवार, दि. २९ रोजी दुपारी दोन वाजता डेंग्यूविषयक माहितीपट दाखविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डी. एस. गबरे मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवार, दि. ५ रोजी सायंकाळी चार वाजता डॉ. अविनाश पोळ यांचे स्वच्छता मोहीम आणि नागरिकांचा सहभाग या विषयावर डॉ. अविनाश पोळ यांचे व्याख्यान होणार आहे.
सारे मेहरबान आजपासून ‘झाडून’ रस्त्यावर!
By admin | Updated: November 28, 2014 23:49 IST