शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सर्व विषयांमध्ये पास असूनही विद्यापीठ म्हणते नापास!

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

हजारो विद्यार्थी संभ्रमात : कला शाखेचे पहिले दोन वर्षे उत्तीर्ण असूनही अंतिम गुणपत्रिकेत केले नापास

सातारा : शिवाजी विद्यापीठांतर्गत घेतल्या जात असलेल्या परीक्षा, निकाल यांचा गोंधळ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सातारा येथील एक तरुण कला शाखेतून पहिली दोन वर्षे उत्तीर्ण झालेला असताना तिसऱ्या वर्षाच्या अंतिम गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण दाखविले आहे. त्यामुळे कोल्हापूर शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सातारा, सांगली,कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.याबाबत माहिती अशी की, सातारा येथील गोरख कुंभार याने येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. तो पहिली दोन वर्षे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याने मार्च-एप्रिल २०१५ मध्ये तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली. त्याचा निकाल नुकताच लागला. हा निकाल पाहिल्यानंतर त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्याने मार्च एप्रिल २०१५ मध्ये सहा सेमिस्टरची परीक्षा दिली आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या निकालात सर्व विषयांत ‘पी’ दाखविलेले आहे. मात्र अंतिम निकाल पत्रिकेत त्याला अनुत्तीर्ण म्हणून जाहीर केले आहे. निकाल हातात पडल्यानंतर गोरख कुंभार याने सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य, व्यवस्थापनाशी संपर्क साधला. त्यांनी ही चूक विद्यापीठाकडून झाल्याचे सांगत विद्यापीठाशीच संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुंभार हे दोन-तीन वेळा विद्यापीठात जाऊनही आले. त्याठिकाणी योग्य ती दखल न घेतल्याने कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एक पत्र देऊन निकाल बदलून देण्याची विनंती केली आहे. प्रकारच्याच तक्रारी असलेल्या हजारो विद्यार्थी विद्यापीठात येत आहेत. परीक्षा नियंत्रण मंडळांशी त्यांनी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांशी चांगली वागणूक दिली जात नाही. एका टेबलवरून दुसरीकडे फिरविले जात आहे. (प्रतिनिधी)निकाल लागून महिना संपत आला तरी बदल झालेला नाही. एम.ए. प्रवेशासाठी ३० जुलै हा अंतिम मुदत आहे. त्यामुळे पुढील वर्ष वाया जाऊ शकते. विद्यापीठात गेलो असता तेथेही आम्हाला हिन वागणूक देण्यात आली आहे. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नसताना आत जाण्यास रोखले.- गोरख कुंभार, परीक्षार्थीचार हजार विद्यार्थ्यांपुढे तुझं काय होणार?गोरख कुंभार यासंदर्भात विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटला असता अनोखाच अनुभव आला. ‘विद्यापीठात चार हजार विद्यार्थी आहेत. त्यात तुझं एकट्याचं काय घेऊन बसलास. तू कुठंही गेला तरी काही फरक पडणार नाही,’ असा सज्जड दमच त्या महाशयांनी भरला.सुरक्षारक्षकाकडून धक्काबुक्कीकोणतेही विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानमंदिर असते. या ज्ञानमंदिरात गेलेल्या विद्यार्थ्यांना अनोखाच अनुभव येत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थी विद्यापीठात येत असतात. विद्यापीठातील सुरक्षारक्षकांकडून धक्काबुक्की सहन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.