शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात येणारे सर्व रस्ते सील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST

मलकापूर : शासनाने लावलेले निर्बंध मंगळवारपासून आणखीनच कठोर करण्यात आले. मलकापुरातील मेडिकल दुकाने वगळता भाजीपाला, किराणासह अत्यावश्यक सेवेतील इतर ...

मलकापूर :

शासनाने लावलेले निर्बंध मंगळवारपासून आणखीनच कठोर करण्यात आले. मलकापुरातील मेडिकल दुकाने वगळता भाजीपाला, किराणासह अत्यावश्यक सेवेतील इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद करून फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली आहे. सकाळपासूनच शहरात पालिकेच्या घंटागाडीच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा देण्यात आला. पोलिसांनी शहरातील मुख्य रस्ते सील केले आहेत. रस्त्यावर विनाकारण कोणी फिरू नये अशा सूचना वारंवार देण्यात येत होत्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेले कडक निर्बंध मंगळवारपासून आणखीन कठोर करण्यात आले आहेत. दुपारी बारा वाजता तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील नाकाबंदीची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी शिवछावा चौकात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून चौकशी करण्यात येत होती. बी. आर. पाटील यांनी विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांचा गाड्या जप्त करण्याचे आदेश दिले. तसेच दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार येथील शिवछावा चौकात पोलीस उपनिरीक्षक सदाशिव स्वामी यांच्‍यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत सबळ पुराव्याअभावी फिरणाऱ्या तेरा दुचाकीस्वारांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या. बँकिंग कर्मचारी व इतर अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचे आयकार्ड तपासणी करून पूर्णपणे खात्री झाल्यानंतरच त्यांना सोडले जात होते.

कोट

शहरात प्रभागनिहाय अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुग्धालय, किराणा माल, मटण-चिकन विक्री करणाऱ्या दुकानदारांची नोंदणीकृत यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्या दुकानदारांनी संबंधित प्रभागांमध्येच घरपोच सेवा देण्यासाठी बाहेर पडावे. यादीतील नाव व आधारकार्ड हेच ओळखपत्र असून, पोलिसांनी अडवल्यास यादीतील नाव व आधार कार्ड दाखवावे. कोणत्याही कारणांसाठी गर्दी करू नये.

- राहुल मर्ढेकर

मुख्याधिकारी

कोट

प्रत्येक गावातील शेतकरी व अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी त्या त्या गावांतच सेवा द्यावी. उगाच इतर गावांत जाऊ नये. शहरातही आपापल्या गल्लीत, मोहल्ल्यात व पेठेतच घरपोच सेवा द्यावी. कोरोनाला थांबवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने शासनाच्या नियमांचे पालन करावे.

-

अमरदीप वाकडे,

तहसीलदार, कराड

कोट

कोरोनाला थाेपविण्यासाठी शासन, पालिका प्रशासन व पोलीस कठोर नियमांची अंमलबजावणी करत आहेत. नागरिकांनीच बाहेर पडू नये. शासनाला सहकार्य करावे. योग्य कारणांशिवाय फिरणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.

- बी. आर. पाटील

वरिष्ठ पोलीस निरीक्षक

फोटो ०४मलकापूर०१,०२

मलकापुरात शिवछावा चौकातील नाकाबंदीची पाहणी करताना तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर आदी. (छाया :माणिक डोंगरे)