शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

इथल्याही पुलांना ‘सावित्री’चं भय...

By admin | Updated: August 4, 2016 01:30 IST

जिल्ह्यातील १० पेक्षाही जास्त पूल ब्रिटिशकालीन

सातारा : महाडच्या ‘सावित्री’ नदीनं तब्बल ३० जणांना पोटात घेतल्यानंतर ब्रिटिशकालीन पुलांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील तिच्याच भगिनी असणाऱ्या नद्यांवरील जुन्या पुलांचा वापर आजही जनतेच्या नाकावर टिच्चून केला जातोय. अनेक पुलांनी ‘शंभरी’ गाठलीय. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नोंदीनुसार यातील काही पूल ‘गुड कंडिशन’मध्ये असले तरी कोणत्याही क्षणी या पुलावर ‘महाड’सारखी दुर्घटना घडू शकते. जुने पूल पाडून नवीन वाहतूक व्यवस्था निर्माण करा, ही सर्वसामान्य सातारकरांची आर्त हाक आजपावेतो शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचलीच नाही. म्हणून ‘लोकमत टीम’ने जिल्ह्यात प्रत्येक ब्रिटिशकालीन पुलाचा घेतलेला शोध...सातारकर धाडसी की यंत्रणा बेफिकीर ?धोकादायक पुलावरून प्रवास : बांधकाम विभागाकडे ‘गुड कंडिशन’ म्हणून नोंदजावेद खान-साताऱ्यातील संगमनगर येथील कृष्णा नदीवरील कृष्णा पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली असूनदेखील या पुलाला अद्यापही धोका नसल्याचे बांधकाम विभागाने सांगितले असले तरी पुलाला भिंतीमध्ये वाढतच जाणाऱ्या पिंपळाच्या झाडांची मुळे खोलवर रुजून बांधकाम ठिसूळ करण्याच्या मार्गावर आहेत. तर पुलावर पडलेल्या खड्ड्यात वाहने आदळत असल्याने पुलावर मोठे दणके बसत असल्याने या पुलाच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांतून प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. महाड येथील ब्रिटिश काळातील पूल वाहून गेला. यामध्ये दोन एसटी बसेस प्रवाशांसह वाहून गेल्याची भीती व्यक्त होत असताना मात्र सातारकरांना कृष्णा पुलाबाबत काळजी वाटू लागली आहे. दि. २८ जून १९१५ रोजी या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानुसार जून २०१५ रोजी या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली असून, या पुलाबाबत वैधता संपल्याचे ब्रिटिशांचे पत्रही बांधकाम विभागाला आले होते. परंतु बांधकाम विभागाने या पुलाची पाहणी करत अजून काही वर्षे या पुलाला कोणताच धोका नसल्याचे सांगितले आहे. तरी देखील आजच्या घटनेमुळे सातारकरांना या पुलाबाबत काळजी वाटू लागली आहे.एकूण ७ कमानी असलेला दगडी पूल हा साताऱ्याच्या कृष्णा नदीत वैभवाला भर टाकत आहे. सध्या या पुलाच्या दोन्ही बाजूस काही ठिकाणी पिंपळाची झाडे वाढत आहेत. यांची मुळे दगडाच्या खाचांमधून खोलवर रुजली आहेत. तर पुलाच्या रस्त्यावरच मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून येणारे प्रत्येक वाहन जागो-जागी खड्ड्यात आदळत असून, याचा दणकाही पुलाला बसत असल्याने हा पूल रहदारीला कितपत सुरक्षित असू शकतो, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या पुलांव्यतिरिक्त जिल्ह्यातील नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या हद्दीत असणारे जुने पूलही धोकादायक ठरत आहेत. या बाबीकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.ब्रिटिश एजन्सीचे पत्र‘लोकमत’ने या धोकादायक पुलांबाबत वेळोवेळी आवाज उठवला आहे. ब्रिटिश एजन्सीने यातील बहुतांश पुलांबाबत प्रशासनाला पत्र पाठवून सजग केले असले तरीही बांधकाम खात्याच्या दफ्तरी यापैकी बहुसंख्य पुलांची नोंद ‘इन गुड कंडिशन’ अशी असल्याचे वास्तव समोर येत आहे. महाडच्या दुर्घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पुलांचा तातडीने सर्व्हे करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. यापूर्वीचे रिपोर्ट काय आहेत, यावर विसंबून राहण्यापेक्षा आजच्या क्षणी जिल्ह्यातील जुन्या पुलांची अवस्था जाणून घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी ब्रिटिशकालीन पुलांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. सातारा-कोरेगाव रस्त्यावरील माहुली पुलाचा अभ्यास मे महिन्यात केला असला तरी आज पुन्हा एकदा या पुलाच्या सुरक्षिततेविषयी अभ्यास करण्यात आला आहे. नवीन पुलाच्या बांधकामासाठी लवकरात लवकर प्रक्रिया राबविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.- अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी, सातारा