शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही मद्यपींनी रिचवली ११४ कोटींची दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:44 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लॉकडाऊन काळातही मद्यप्रेमींनी ९२० कोटी लिटर दारू रिचवली आहे. या माध्यमातून शासनाला ११४ कोटींचा ...

सातारा : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लॉकडाऊन काळातही मद्यप्रेमींनी ९२० कोटी लिटर दारू रिचवली आहे. या माध्यमातून शासनाला ११४ कोटींचा महसूल मिळाला आहे.

कोरोनामुळे अनेक व्यवसायावर विपरीत परिणाम होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र दारू विक्रीवर काहीच परिणाम झालेला दिसून येत नाही. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश वेळा दुकाने बंद होती. मात्र तरीसुद्धा मद्यपींनी संधी साधत दारू खरेदी केली. त्यामुळे साहजिकच शासनाच्या तिजोरीत महसूलच्या निमित्ताने भर पडली. २०१९ च्या तुलनेत २०२०-२१ या वर्षात शासनाला कमी महसूल मिळाला आहे. कोरोनामुळे बऱ्याचदा दुकाने बंद होती. त्यामुळे सकाळी सात ते अकरा या वेळेत घरपोच विक्रीला परवानगी देण्यात आली होती. या काळात सर्वाधिक दारू विक्री केली गेली. या घरपोच विक्रीलाही मद्यपींचा चांगला प्रतिसाद मिळाला. बीअरच्या तुलनेत देशी-विदेशी मद्याची जास्त विक्री झाली आहे. त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाया केल्या. यातूनही शासनाला चांगला महसूल मिळाला आहे.

चौकट:

महसूलला दारूचा आधार

जिल्ह्यात २०१९-२० मध्ये दारू विक्रीतून शासनाला ६२० कोटी ७१ लाखांचा महसूल मिळाला आहे. तर २०२१ मध्ये ११४ कोटी ३७ लाखांचा महसूल मिळाला आहे.

दर वर्षी उत्पादन शुल्कच्या माध्यमातून शासनाला सर्वाधिक महसूल मिळतो.

कोट: जिल्ह्यात वर्षभरात दोनशेहून अधिक जणांवर अवैद्य दारू विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अवैद्य दारू निर्मिती आणि विक्रीवर नियमित कारवाई होत असल्याने वैध दारूविक्रीच्या माध्यमातून मिळणारा महसूल यामध्ये वाढ झाली आहे. अवैध दारूविक्रीवर येणाऱ्या काळामध्येही कडक कारवाई केली जाणार आहे.

अनिल चासकर, अधीक्षक, उत्पादन शुल्क, सातारा

चौकट: दोन वर्षांतील दारूविक्री

२०२०-२१

११४ कोटी ३७ लाख

....

२०१९-२०

६२० कोटी ७१ लाख