शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांना सर्रास विकली जातेय दारू!

By admin | Updated: March 24, 2015 00:17 IST

नियम धाब्यावर : देशी-विदेशी दुकानदारांचे पितळ ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमुळे उघडे

सातारा : कोवळ्या वयातील मुलांना दारू विकण्यास कायद्याने प्रतिबंध असला, तरी पैसे मिळताच वाईन शॉपमधून मुलांच्या हाती सर्रास बाटली ठेवली जाते, हे कटू वास्तव ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. हाच ‘उदार’ दृष्टिकोन कायम राहिल्यास लहानगे जीव व्यसनाधीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.सातारच्या तांदूळ आळीमध्ये शनिवारी (दि. २१) ऐन गुढीपाडव्याला आठ-दहा वर्षांची मुले दारूच्या नशेत झिंगल्याचे नागरिकांना पाहायला मिळाले होते. नागरिकांनी त्यांचे मुंडण केले होते. कागदावर शेंगदाणे-फुटाणे घेऊन ही मुले झिंगत बसली होती. त्यांना दुकानातून दारू मिळालीच कशी, असा प्रश्न उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर सातारा आणि कऱ्हाड शहरांत एकाच वेळी हे स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. या मोहिमेमध्ये काही लहानग्यांनी निडर होऊन ‘लोकमत’ला साथ दिली. दोन्ही शहरांमध्ये एखादा अपवाद वगळता लहान मुलांच्या हाती बाटली ठेवताना विक्रेत्यांना काहीच वाटले नाही. एखाद्या ठिकाणी ‘कुणासाठी पाहिजे,’ एवढाच प्रश्न विचारण्यात आला. परंतु, नोट पुढे करताच दारू दिली गेली. या मोहिमेत देशी आणि विदेशी दारूच्या दुकानांमध्ये आठ ते सोळा वर्षे वयोगटातील मुलांना पाठविण्यात आले. काही लहानग्यांना तर ‘ब्रॅण्ड’ही लक्षात राहत नव्हते. त्यांचे चाचपडणे पाहून त्यांना ‘नाव लिहून आणा,’ असे सांगितले गेले. नियमानुसार एकवीस वर्षांची अटतंबाखूजन्य पदार्थांची विक्री अठरा वर्षांखालील मुलांना करता येत नाही. दारूच्या बाबतीत हा नियम एकवीस वर्षांचा आहे. काही वर्षांपूर्वी दारू पिण्याचा परवाना देण्याचे वय एकवीसवरून एकोणीस करावे, असा घाट घातला गेला होता. परंतु, तसा नियम होऊ शकला नाही. आजही दारू पिण्यासाठी परवाना अनिवार्य तसेच एकवीस वर्षांच्या आतील मुलांना दारू द्यायची नाही, असा नियम आहे. परंतु, या नियमाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे ‘लोकमत टीम’ला आढळून आले.