शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

दारूच्या बाटलीला मारले जोडे!

By admin | Updated: January 1, 2015 00:14 IST

अभियानाला सुरुवात : परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेचा अभिनव उपक्रम

सातारा : वर्षाअखेरीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील तरुणाईने वेगळी वाट चोखाळत २९ डिसेंबर ते ५ जानेवारी या सप्ताहात चालणाऱ्या ‘व्यसनविरोधी युवा’ अभियानाचा दारूच्या बाटलीला जोडे मारून प्रारंभ केला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था, विवेकवाहिनी तसेच राष्ट्रीय सेवा योजना सातारा जिल्हा यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे अभियान सुरू झाले.युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, सातारा येथे आयोजित व्यसनविरोधी युवा निर्धार परिषदेद्वारे या अभियानाची सुरुवात झाली. यावेळी परिवर्तन संस्थेचे डॉ. हमीद दाभोलकर, प्रा. ए. एन. यादव, प्रा. एस. एन. जाधव, प्रा. आर. व्ही. यादव, प्रशांत पोतदार उपस्थित होते. डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘तरुणाईमध्ये उर्मी असते, ती चांगल्या अर्थाने वापरून त्यांनी व्यसनमुक्तीचे दूत बनावे. स्वत: व्यसनापासून दूर राहावेच; पण इतरांनाही व्यसनाच्या समस्येतून सोडविण्यासाठी मदत करावी.’परिषदेत १३ वर्षे व्यसनाधीन राहून आता पूर्ण व्यसनमुक्त असलेल्या रवींद्र गायकवाड व त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी यांची मुलाखत उदय चव्हाण व किशोर काळोखे यांनी घेतली. समवस्कांच्या दबावातून आपल्याला व्यसन कसे लागले, व्यसनामुळे आपले आयुष्य कसे अंधाराच्या खाईत ढकलले गेले होते; पण व्यसनमुक्तीच्या उपचाराने आपण सावरलो व आता कशा प्रकारे व्यसनमुक्त आयुष्य जगत आहोत, याचा प्रत्यक्ष अनुभव या मुलाखतीदरम्यान गायकवाड दाम्पत्याने मांडले. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केले. याअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले. (प्रतिनिधी)‘दारू सुटल्यावर केला दागिनाव्यसनामुळे दागिने देखील गहाण ठेवायला लागले होते; पण व्यसनमुक्त होऊन पतीने तीन तोळे सोने केले व मंगळसूत्राला अर्थ प्राप्त करून दिला,’ अशी भावना रवींद्र गायकवाड यांच्या पत्नीने व्यक्त केली. परिषदेत २५० तरुण-तरुणींनी व्यसनमुक्ती दूत बनण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. येत्या सप्ताहामध्ये त्यांच्या मार्फत समाजात व्यसनविरोधी प्रबोधन करण्याचा निर्धार करण्यात आला.