शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अक्षयकुमारच्या ‘केसरी’चा सेट खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:39 IST

पिंपोडे बुद्रुक/वाठार स्टेशन : अभिनेता अक्षयकुमार च्या ‘केसरी’ चित्रपटाचे चित्रीकरण कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे सुरू आहे. त्यातील युद्धाचा प्रसंग साकारण्यासाठी उभारलेला सेट मंगळवारी सायंकाळी आगीत खाक झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कॅमेरे भस्मसात झाले असून, सेटचे नुकसान झाले.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपोडे बुद्रुक येथे तीन महिन्यांपासून धर्मा प्रॉडक्शन ...

पिंपोडे बुद्रुक/वाठार स्टेशन : अभिनेता अक्षयकुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचे चित्रीकरण कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे सुरू आहे. त्यातील युद्धाचा प्रसंग साकारण्यासाठी उभारलेला सेट मंगळवारी सायंकाळी आगीत खाक झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कॅमेरे भस्मसात झाले असून, सेटचे नुकसान झाले.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपोडे बुद्रुक येथे तीन महिन्यांपासून धर्मा प्रॉडक्शन निर्मित अक्षयकुमार यांच्या ऐतिहासिक केसरी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. अक्षयकुमार मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे चित्रीकरण पूर्ण करून ते मुंबईकडे गेले होते. काही युद्धजन्य परिस्थितीचे शॉट घेण्याचे काम सुरू होते. या दरम्यान, साडेपाचच्या सुमारास अचानक आग लागली.आग विझविण्यासाठी शरयू शुगर, किसन वीर कारखाना, फलटण व वाई येथून अग्निशमन बंब बोलावले. त्यांनी एक तासाने आग नियंत्रणात आणली. मात्र सेटसाठी लाकूड व प्लास्टिक साहित्याचा वापर केल्याने आगीने अल्पावधीत उग्ररूप धारण केल्याने सेटचे मोठे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनीही शर्तीचे प्रयत्न केले. पण अपयश आले.सारागड उद्ध्वस्तपंजाबमधील २१ शीख सैनिकांसाठी अफगानी लडाखूंविरोधात एकाकी झुंज दिली होती. हा इतिहास सारागड नावाच्या किल्ल्यावर घडला. याच सारागडचा सेट पिंपोडे बुद्रुक येथील घुमाई देवी परिसरात उभारला होता. त्यासाठी दोन महिने लागले. सारागडमधील युद्धजन्य शॉट घेत असताना अचानक आग लागली. त्यात तो जळून खाक झाला.वाºयामुळंहोत्याचं नव्हतंया चित्रपटात एका स्टेजला आग लागल्याचे दृश्य चित्रित करायचे होते. त्यासाठी उभारलेल्या स्टेजवर छोटा स्फोट घडविला. आगही लागली; पण वाºयामुळे आगीने भडका घेतला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले.