शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांना सांगूनच अक्षयने केले होते विषप्राशन...

By admin | Updated: January 26, 2015 00:45 IST

वादही झाला : मित्रांनी पेनाने टोचले म्हणून संताप, शाळेतून तडक घरी परतला

सातारा : आईच्या भेटीसाठी व्याकूळ झालेला आणि मुळातच ‘शॉर्ट टेम्परड’ असणारा अक्षय चव्हाण याला शनिवारी शाळेत काही मित्रांनी पेनाने टोचले आणि तो आणखी भडकला. यावेळी मित्रांशी त्याचा थोडाफार किरकोळ वादही झाला. परिणामी तो आणखी चिडला. संतापलेल्या अक्षयने शाळा अर्ध्यातूनच टाकून तडक घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. मित्रांनी त्याला अडविले; मात्र तो कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. ‘मी आता औषध घेणारच आणि जीव संपवणार,’ असा निर्णयच त्याने येथे जाहीर केला. तो तडक घराकडे आला आणि येथेच त्याने उंदीर मारण्यासाठी ठेवलेले औषध पाण्यात मिश्रण करून प्यायला. मात्र, अक्षयचे शिक्षक संजय वीरकर आणि अनिकेत बोराटे विद्यार्थी मित्राने दाखविलेल्या तत्परतेमुळे त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात यश आले. अक्षय चव्हाण हा बारा वर्षीय विद्यार्थी त्रिपुटी येथील एका शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आईची भेट होत नसल्याचे कारणाने व्याकूळ होऊन शनिवारी त्याने सकाळी उंदीर मारण्याचे औषध पाण्यात मिश्रण करून प्यायला. यामुळे त्याला उलट्या झाल्या. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे प्राण वाचले. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. अक्षयचे वडील हयात नाहीत. आजोबा शिवाजी ब्रह्मानंद चव्हाण (वय ७०) आणि आजी फुलाबाई (वय ६५) त्याचा सांभाळ करत आहेत. अक्षयची आई मात्र, महाड येथे मोलमजुरी करते. तिने तिच्यासमवेत आपल्या थोरल्या मुलाला ठेवले आहे. अक्षयदेखील तिच्याकडेच होता. मात्र, येथे तो शाळेत जात नव्हता. परिणामी गेल्यावर्षी त्याला त्याच्या आजोबांनी महाड येथून त्रिपुटीत आणले आणि शाळेत टाकले. सुरुवातीच्या काळात काही वाचायलाही न येणारा अक्षय मात्र, दोन वर्षांत इतका तयार झाला की खो-खो आणि कबड्डीतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याने नाव मिळविले. तो गृहपाठातही तत्परता दाखवू लागल्याने तो शाळेतील शिक्षकांचा आवडता बनला. मात्र, तत्काळ संतापणे ही त्याची सवय कायमचीच होती. त्याची प्रचिती शनिवारी अनेकांना आली.रविवारी तो जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला आत्महत्येचा मनात विचार का आला, अशी विचारणा केली तर अक्षय त्यावर काही फारसा बोलला नाही. मात्र, त्याचे आजोबा शिवाजी आणि आजी फुलाबाई यांचा चेहरा रडवेला झाला होता. २००५ मध्ये अक्षयच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तो काही दिवस महाडला आईकडे राहिला. मात्र, आता तो आजी-आजोबांकडे आहे. झाडावर बसून अक्षय पाहत होता...अक्षयचे आजोबा शिवाजी चव्हाण त्याला नेहमी शाळेत जाण्यासाठी आग्रह करायचे; मात्र अक्षयला अनेकदा शाळेत जायचा कंटाळा यायचा. अक्षय शाळेत जात नसल्याचे पाहून आजोबांनी त्याला मारहाणही केली. मात्र, सारखा-सारखा आग्रह होत असल्याचे पाहून अक्षय एकदा घरातून पळून गेल्याची आठवण आजोबांनी सांगितली. अक्षयला गावातील अनेक मंडळी शोधत होती. कदाचित तो आपल्या आईकडे महाड येथे गेला असावा म्हणून आजोबा तिकडे गेले. मात्र, अक्षय तेथेही नव्हता. अक्षय मात्र हा संपूर्ण प्रकार गावातील एका झाडावर बसून पाहत होता, अशी आठवणही त्याची आजी आणि शिक्षकाने यावेळी सांगितली. बाळा पुन्हा असे करू नकोसजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे आजी, आजोबा अतिशय घाबरले होते. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पाहून ‘बाळा, पुन्हा कधी असे करू नकोस,’ असे रडतच्या त्याच्यापुढे विनंती करत होते. ‘तुझी आई आता दोन दिवसांनी त्रिपुटीला येणार आहे. त्यामुळे तू आता तिच्यासाठी व्याकूळ होऊ नकोस,’ असेही आजी-आजोबा अक्षयला सांगत होते.