शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा टाकण्यासाठी विमानाने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:26 IST

कºहाड (जि. सातारा) : पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाºया टोळीला कºहाड पोलिसांनी चतुर्भुज केल्यानंतर तपासात या टोळीचे अनेक कारनामे समोर येत आहेत.

ठळक मुद्दे कºहाड पोलिसांसमोर टोळीचा गौप्यस्फोट देशभरातील अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल!

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड (जि. सातारा) : पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाºया टोळीला कºहाड पोलिसांनी चतुर्भुज केल्यानंतर तपासात या टोळीचे अनेक कारनामे समोर येत आहेत. दरोडा टाकण्यापूर्वी ही टोळी दोनवेळा दिल्लीतून चक्क विमानाने थेट पुण्यात आणि तेथून कºहाडात आली होती. तसेच या टोळीने आजपर्यंत देशभरात रेकी करून अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

अक्षय भारत कावरे (रा. अपशिंगे, ता. कडेगाव, जि. सांगली), अनमोल जीवनसिंग शर्मा (रा. हसी, हरियाणा), दीपक रामराज गर्ग (रा. पैकरहेडी, हरियाणा), ईश्वरसैनी राजकुमारसैनी (रा. पिहोवा, हरियाणा) व महेंद्र सुर्यग्यान गुजर (रा. बाबुधाम, नवी दिल्ली) अशी अटकेत असलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

कºहाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे १२ आॅगस्टला रात्री दत्तकृपा पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता. पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीला शिताफीने पकडले होते. तपासा-दरम्यान दरोडेखोरांचे दिल्लीपर्यंतची ‘कनेक्शन’ पोलिसांच्या समोर आले. दिल्लीतील एका गँगस्टरसोबतची छायाचित्रेही पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता टोळीचे अनेक कारनामे समोर आले. कºहाडनजीक वडगाव हवेली येथे दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीने कडेगाव येथे पंपावर दरोडा टाकला होता. त्यापूर्वी दोनवेळा ही टोळी दिल्लीमधून थेट विमानाने पुण्यात व तेथून खासगी वाहनाने कºहाडात आली होती. सातारा व सांगली जिल्ह्यातील काही पंपांची पाहणी करून या टोळीने दरोड्याचा कट रचला होता. पुढे काही दिवसांतच कडेगाव तसेच वडगावच्या पंपावर दरोडा टाकला होता. टोळीने अशाच प्रकारचे गुन्हे मुंबई आणि दिल्ली शहरासह व पंजाब राज्यात केल्याचे स्पष्ट झाले आहे.म्होरक्या कुटुंबासह पसारवडगाव हवेली येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाºया टोळीला पोलिसांनी दोन तासांत जेरबंद केले. त्यानंतर पोलिस तपासात या टोळीमध्ये कडेगाव तालुक्यातील अपशिंगेतील एकाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्यालाही अटक केली. मात्र, आपले साथीदार पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती नेर्ली ( ता. कडेगाव) येथील म्होरक्याला मिळाली. त्यानंतर तो कुटुंबासह पसार झाला.