शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर पोलीस संघ ठरला अव्वल

By admin | Updated: December 19, 2014 23:35 IST

कबड्डी स्पर्धा : सेवागिरी चषकाचा मिळलिला मान

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या यात्रेनिमित्त झालेल्या ‘श्री सेवागिरी चषक’ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात अहमदनगर पोलीस संघाने अहमदनगरच्या ‘रणवीर भेंडा’ कबड्डी संघाचा पराभव करून २५ हजारांच्या बक्षिसासह ‘सेवागिरी चषक’ पटकाविला. या स्पर्धेत राज्यातील नामवंत ३३ संघांनी सहभाग घेतला होता. येथील श्री हनुमानगिरी हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत या स्पर्धा सुरू होत्या. नगरच्या रणवीर भेंडा संघाला द्वितीय क्रमांकाचे १५ हजारांचे, वायफळे येथील खंडेराया कबड्डी संघाला तृतीय क्रमांकाचे दहा हजारांचे तर येडेमच्छिंद्र क्रांतिसिंह शिवनगर कबड्डी संघाला चतुर्थ क्रमाकांचे पाच हजारांचे मिळाले. तसेच विजय पाटील (वायफळे) उत्कृष्ट चढाई, रूपेश शेवते (भुर्इंज) उत्कृष्ट पकड, अधिक घाडगे (येडेमच्छिंद्र) उत्कृष्ट उजवा मध्यरक्षक, किरण मोरकर (अहमदनगर) उत्कृष्ट डावा मध्यरक्षक, गणेश कांबळे (सातारा) उत्कृष्ट उजवा कोपरा, सागर आगळे (अहमदनगर) उत्कृष्ट डावा कोपरा यांना प्रत्येकी एक हजाराची बक्षिसे देण्यात आली.अरण मदने, संजय जाधव, सुनील मदने, रमेश सोनावणे, रेवण पाटील, सुनील खरात, सागर घोरपडे, शाम देवकर, ईशांत वाघमारे, बबलू कांबळे, किरण मदने, सूरज जाधव, विकास शिंदे, सुशांत कांबळे, विशाल वाघमारे व जिल्हा कबड्डी असोसिएशन यांनी स्पर्धेचे नियोजन केले. डी. पी. ननावरे, सुनील खरात, उमेश साबळे, शशिकांत यादव, देशमुख यांनी पंच म्हणून काम पाहिले. रात्री चार वाजता अंतिम सामना संपल्यानंतर विजेत्या संघांना बक्षिसे देण्यात आली. दरम्यान, गुरुवारी दि. १८ सकाळी ११ वाजता आशियाई सुवर्ण पदक विजेत्या भारतीय कबड्डी संघाचा खेळाडू नितीन मदने, श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र.ल. भुजबळ, विजय जाधव, शिवाजीराव जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. (वार्ताहर)महेश पवारला ‘मॅन आॅफ दी मॅचवैयक्तिक बक्षीस अंतर्गत अंतिम सामन्यातील वसीम इनामदार (अहमदनगर) यास ‘मॅन आॅफ द मॅच’चे तर महेश पवार (शिवनगर) यास ’अष्टपैलू’ खेळाडूचे प्रत्येकी एक हजार पाचशे रुपयांचे बक्षीस मिळाले.