सातारा : राज्य शासनाने नोकरीत ओबीसीसाठी मेगा भरती त्वरित सुरू करावी, या व इतर मागण्यांसाठी भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण लागू होऊन २६ वर्षे झाली आहेत. आतापर्यंतच्या २६ वर्षांच्या काळात १ लाख १७ हजार ओबीसी नोकऱ्यांचा बॅकलॉग भरण्यात आलेला नाही. परिणामी रोजगाराअभावी तरुण उद्ध्वस्त होत आहेत. हा बॅकलॉग न भरल्यास राज्यभर ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
त्याचबरोबर ओबीसींना क्रीमी लिअरची लावलेली घटनाबाह्य जाचक अट रद्द करावी. त्यामुळे ओबीसींना घटनात्मक आरक्षणाचे लाभ मिळत नाहीत. राज्य शासनाने ज्या-ज्यावेळी नोकरभरती केली तेव्हा ओबीसींच्या घटनात्मक आरक्षणाप्रमाणे १९ टक्के देणे आवश्यक होते. मात्र, मंडल आयोगाची अंमलबजावणी २६ वर्षांनंतरही अन्यायकारकच असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो दि.१६ सातारा ओबीसी आंदोलन फोटो...
छाया : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
.....................................................