शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शांतता बैठकीत पोलिसांवर आगपाखड

By admin | Updated: March 11, 2015 00:12 IST

नागरिकांचा रोष : समित्या केवळ कागदावरच उरल्याचा आरोप

कऱ्हाड : कऱ्हाड शहर पोलिसांचा सर्वसामान्यांशी संपर्कच नाही. त्यामुळे सामान्यांच्या अडचणी, त्यांच्या अपेक्षा व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत पोलिसांना कसलीच माहिती नसते. मोहल्ला समिती, पोलीस मित्र अशा अनेक समित्या पोलिसांनी स्थापन केल्या आहेत. मात्र, या समित्या केवळ कागदावरच उरल्या असल्याचा आरोप नागरीकांनी शांतता समितीच्या बैठकीत केला. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस उपअधिक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसिलदार सुधाकर भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने, आप्पा गायकवाड, दादा शिंगण, सागर बर्गे, फारूख पटवेकर, मजहर कागदी, बादशाहभाई मुल्ला यांच्यासह अनेक नागरीक उपस्थित होते.  शांतता समितीची बैठक कायदा व सुव्यवस्थेबाबत होते. मात्र, एकही नगरसेवक किंवा नगराध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहत नाहीत. नगरसेवकांना कऱ्हाडातील शांततेशी काही देणंघेणं नाही, असा आरोपही उपस्थित नागरीकांनी यावेळी केला. आप्पा गायकवाड यांनी पोलिसांकडून शांतता समितीच्या सदस्यांना मिळणाऱ्या सन्मानावरच बोट ठेवले. पोलिसांकडून सन्मान मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मजहर कागदी यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. मनसेचे सागर बर्गे यावेळी बोलताना म्हणाले, शांतता समितीची बैठक महत्वाची असते. मात्र, या बैठकीला असलेली अत्यल्प उपस्थिती चिंताजनक आहे. पोलीस व पालिका प्रशासनाची जागरूकता त्यावरूनच दिसुन येते. पोलिसांचा सामान्यांशी कसलाही संपर्क नाही. सामान्य लोकांमध्ये किंमत असणाऱ्या नागरीकांना पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीस बोलविणे गरजेचे आहे. पूर्वी शांतता समितीची बैठक होत होती. त्यावेळी नागरीक मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित रहायचे; पण सध्या पोलिसच सामान्यांना जवळ करीत नसल्याने बैठकांकडे पाठ फिरविली जात आहे. (प्रतिनिधी)दोषींवर कठोर कारवाई होईलउंब्रजमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कऱ्हाडात शांतता कायम राखली, ही बाब कौतुकास्पद आहे. उंब्रज प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही यावेळी तहसिलदार सुधाकर भोसले यांनी दिली.