शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

दारूदुकानांत वयोमर्यादेचा फलक सक्तीचा

By admin | Updated: March 25, 2015 00:39 IST

तातडीने आदेश काढणार : ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधील बाटल्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर; राज्य उत्पादनशुल्क विभागाकडून गंभीर दखल--लोकमतचा दणका

सातारा : ‘२१ वर्षांखालील व्यक्तीला बीअर आणि २५ वर्षांखालील व्यक्तीला दारू मिळणार नाही,’ अशा आशयाचा फलक प्रत्येक दारूदुकानात लावण्याची सक्ती करण्यात येणार आहे. लहान मुलांना सर्रास दारूची विक्री केली जाते, हे दर्शविणाऱ्या ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनची राज्य उत्पादनशुल्क विभागाने गांभीर्याने दखल घेतली असून, फलकाबाबतचे आदेश तातडीने काढण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांनी दिली.साताऱ्यात शनिवारी (दि. २१) भरवस्तीच्या ठिकाणी आठ ते दहा वर्षे वयोगटातील चार मुले दारू पिताना आढळून आली होती. नागरिकांनी शिक्षा म्हणून या मुलांचे मुंडन केले होते. या मुलांना दुकानातून दारू मिळाली कशी, याचा शोध घेण्यासाठी ‘लोकमत टीम’ने सोमवारी (दि. २३) सातारा आणि कऱ्हाडमध्ये स्टिंग आॅपरेशन केले. नऊ ते सोळा वर्षे वयोगटातील मुलांना एखादा अपवाद वगळता मागेल त्या ‘ब्रॅण्ड’ची दारू देण्यात आली. अशा ‘खुलेपणा’मुळे कोवळ्या वयात व्यसनाधीनता वाढण्याची शक्यता किती वाढली आहे, हे विदारक वास्तव स्टिंग आॅपरेशनमधून बाहेर आले. लहान मुलांना दुकानदारांनी विकलेल्या दारूच्या बाटल्या ‘लोकमत टीम’ने राज्य उत्पादन शुल्क विभागात मंगळवारी जमा केल्या. त्यावेळी यासंदर्भातील कायद्यांची, नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा शब्द अधिकाऱ्यांनी दिला. कायद्यानुसार दारू पिण्याचा परवाना असल्याखेरीज दारू विकत घेणे, बाळगणे आणि सेवन करणे नियमबाह्य आहे. तथापि, पिणाऱ्यांमध्ये परवानाधारकांची संख्या नगण्य असल्याचे दिसून येते. याखेरीज वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत दारूचा परवाना दिलाच जात नाही. तरीही पंचवीस वर्षांखालील असंख्य तरुण नशेच्या आहारी गेल्याचे दिसून येते. केवळ बीअर पिण्यासाठी परवान्याचे वय २१ वर्षे आहे. कोणत्याही प्रकारची दारू पिण्यासाठी पूर्वी २१ वर्षांची अट होती. मात्र, एक जुलै २००५ च्या शासकीय आदेशानुसार ती २५ वर्षे करण्यात आली. याखेरीज ‘परमीटधारकालाच दारू मिळेल,’ असा फलक दारूदुकाने आणि बारमध्ये लावणे कायद्याने बंधनकारक आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. २५ वर्षांखालील व्यक्तीला परवाना मिळतच नसल्याने असा फलक लावल्यास कोवळी मुले दारूदुकानात फिरकणारच नाहीत, अशी पुस्ती त्यांनी जोडली. (प्रतिनिधी)कायद्यानुसार २१ वर्षांपुढील व्यक्तीलाच मद्यविक्री केली जाते. त्यामुळे दुकानदारांनी लहान मुलांना मद्यविक्री करून शासनाच्या कायद्याचे उल्लंघन केले आहे. मुलांना तर समज दिलीच पाहिजे; मात्र यापुढे कायदा मोडणाऱ्या दुकानदारांवरही तातडीने कारवाई झाली पाहिजे.- गणेश भोसले, व्यावसायिककायद्यांची कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे; मात्र त्याबरोबरच पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणेही गरजेचे आहे. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून पालकांनाही वास्तवाची जाणीव करून दिली असून, यापुढे मुलांच्या बाबतीत पालक अधिक सजकपणे लक्ष देतील, अशी खात्री आहे.- प्रतिभा गोगावले, गृहिणीमी कामानिमित्त मोठ्या शहरांत नेहमी जातो. मोठ्या शहरात कुणालाही दारू मिळते हे मी नेहमी बघतो. परंतु साताऱ्यात असे काही घडत असेल, असे मला वाटले नव्हते. ‘लोकमत’मुळे साताऱ्यातील एक मोठे सत्य उजेडात आले असून, व्यसनाधीनता रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.- उदय राजेकदम, व्यावसायिकशौकिनांनो, परवाने घ्या!दारूसाठी बेसुमार खर्च करणारे शौकीन परवान्यासाठी थोडीशी रक्कम खर्च करण्यास मात्र कचरतात. एक हजार रुपयांत दारू पिणे, बाळगणे आणि विकत घेण्याचा ‘तहहयात परवाना’ मिळू शकतो. वर्षासाठी परवाना घ्यायचा झाल्यास केवळ शंभर रुपये खर्च होतो. माजी सैनिकांना हा परवाना विनामूल्य दिला जातो. याखेरीज ३१ डिसेंबरसाठी एक दिवसाचा परवाना मिळण्याचीही सोय आहे. हा एकदिवसीय परवाना देशी दारूसाठी दोन रुपयांत तर विदेशी दारूसाठी तीन रुपयांत मिळतो. परवाना देण्याची पद्धत सुटसुटीत असल्याने संबंधितांनी तातडीने परवाने घ्यावेत, असे आवाहन राज्य उत्पादनशुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप वाळुंजकर, निरीक्षक विजयकुमार टिकोळे यांनी केले आहे.