शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तीन दशकांनंतर सत्तांतर

By admin | Updated: March 26, 2015 00:08 IST

विसापूर सोसायटी : पंचक्रोशी पॅनेलची बाजी; ‘शेतकरी विकास’चा धुव्वा

पुसेगाव : विसापूर, ता. खटाव येथील विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विसापूर पंचक्रोशी विकास पॅनेलने १३ पैकी ११ जागा जिंकून तीस वर्षे सत्तेत असणाऱ्या शेतकरी विकास पॅनेलचा धुव्वा उडवत निर्विवाद वर्चस्व मिळविले. त्यातच विसापूर ग्रामपंचायतीचीही पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोसायटीची ही निवडणूक अतिशय परिणामकारक ठरणार असल्याची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. विसापूर, बुधावलेवाडी, बोबडेवाडी, गाववाडी, पांढरवाडी, रेवलकरवाडी व आवारवाडी कार्यक्षेत्र असलेल्या विसापूर सोसायटीत १२५६ सभासद आहेत. या निवडणुकीत पै. सागरभाऊ साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली विसापूर पंचक्रोशी पॅनेल तर प्रल्हाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनेल अशी राष्ट्रवादी अंतर्गत दुरंगी लढत होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत खटावचे तहसीलदार यांनी १४४ कलम जारी केले होते. सोसायटीच्या या निवडणुकीकडे भावी राजकारणाची दिशा देणारी निवडणूक म्हणून पाहिले जात होते. सोसायटीचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे दोन्ही पॅनेलकडून स्पीकरच्या गाड्या, फ्लेक्स बोर्ड, जनसंपर्क, कोपरा बैठका व जाहीरनामे काढून मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला जात होता. दोन्ही पॅनेलने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. यामुळे या निवडणुकीकडे खटाव तालुक्यासह सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. विसापूर पंचक्रोशी विकास पॅनेलमधील विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून बबन गोविंद बुधावले बिनविरोध निवडून आले, त्यामुळे १२ जागांसाठी निवडणूक झाली. (वार्ताहर) विश्वासात घेऊन कारभार...शेतकरी सभासदांनी विसापूर पंचक्रोशी विकास पॅनेलवर विश्वास टाकून सत्तेची एकहाती सूत्रे दिलेली आहेत. त्या विश्वासाला तडा जाऊ न देता शेतीपूरक व्यवसाय, पारदर्शक कारभारांसह विविध योजना शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू मानून प्रभावीपणे राबविल्या जातील. वरिष्ठ नेते, सहकारी, संचालक व शेतकरी सभासदांना विश्वासात घेऊन सोसायटीचा कारभार केला जाईल, असा विश्वास सागर साळुंखे यांनी व्यक्त केला.