शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाड दुर्घटनेनंतर वाठारचा पूल बंद

By admin | Updated: August 7, 2016 22:57 IST

ब्रिटिशकालीन बांधकामाला तडे : प्रशासनाला अखेर जाग; कोरेगाव तालुक्यातील पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरू

वाठार स्टेशन : येथील ९० वर्षे जुना ब्रिटिशकालीन पुलाला यापूर्वीच तडे गेले असून, महाड दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे. हा पूल रविवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा फलक लावला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. पोलादपूर-पंढरपूर या मार्गावर वाठार स्टेशनपासून जवळ असलेल्या ब्रिटिशकालीन पुलास तडे गेल्यामुळे हा पूल आता अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या वाठार स्टेशन हे ब्रिटिश राजवटीत महत्त्वाचे केंद्र होते. ब्रिटिश काळातील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आजही मोठ्या दिमाखात या ठिकाणी कार्यरत आहे. याशिवाय वाठार स्टेशनची सध्याची ग्रामपंचायतही ब्रिटिशकालीन एका धर्मशाळेत सुरू आहे. वाठार पोलिस ठाणे, वाठार बसस्थानक या सर्वच इमारती ब्रिटिशकालीन आहेत. येथूनच ब्रिटिश लोक महाबळेश्वरकडे जात होते. त्यामुळे वाठार, वाई, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाठार स्टेशन, वाघोली, ओझर्डे, वाई याठिकाणी ब्रिटिशांनी पुलाचे बांधकाम केले होते. बहुतांशी पुलांचे आयुर्मान संपले असतानाही हे पूल कार्यरत ठेवण्याचे काम राज्य शासनाकडून सुरू होते. मात्र, महाडनजीक झालेल्या दुर्घटनेने आता सर्वांचेच डोळे उघडले आहेत. सातारा जिल्ह्यातील अनेक पुलांबाबत सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष ठेवून आहे. कोरेगाव तालुक्यातील अशा अनेक पुलांचा सात बाराच आता सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. वाठार-पिंपोडे बुद्रुकमधील ९० वर्षांचा हा पूल रविवारपासून अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा व सावधानतेचा इशारा देत हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पंढरपूर-पोलादपूर प्रमुख मार्गावरील हा पूल बंद झाल्यामुळे आता अवजड वाहतुकीसाठी वाठार स्टेशन, वाग्देव चौक, तडवळे संमत वाघोली, पिंपोडे बुद्रुक या नवीन मार्गाने वाहतूक सुरू होणार आहे. वाठार पिंपोडे बुद्रुक हे अंतर चार किलोमीटरचे असून, या मार्गामुळे बारा ते तेरा किलोमीटरने वाढणार आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना बसणार आहे. महाबळेश्वर-वाईकडून वाठार स्टेशनकडे येणाऱ्या वाहनांनाही पिंपोडे बुद्रुककडून तडवळे संमत वाघोली गावातून सातारा-लोणंद राज्यमार्गाकडे यावे लागणार आहे. याबाबत कोरेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अहिरे यांनी वाठार स्टेशनजवळील या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केल्याचे पत्रक व फलक सर्वच ठिकाणी लावण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे संबंधित धोकादायक पुलास बॅरिकेट लावून रस्त्याकडेच्या अनेक फलकांवर ‘सावधान अवजड वाहतुकीस बंद’ असल्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने इतर पुलांचीही पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. आणखी किती पूल धोकादायक महाडमधील दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा जिल्ह्यातील अनेक ब्रिटिशकालीन पुलांपैकी वाठार स्टेशननजीकच्या पुलास ‘रेड सिग्नल’ दाखवला आहे. आता यापुढे किती पुलांच्या बाबतीत बांधकाम विभाग जागरुकता दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्रुक या गावादरम्यानचा नव्वद वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलास खालील बाजूने तडे गेले आहेत. हे तडे दहा ते बारा वर्षांपूर्वीचे असून, यापूर्वी एकवेळा या तड्यांचे गळती काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गेल्या एक ते दोन महिन्यांपासून या पुलाच्या तड्यांचा आकार विस्तारत असल्याने हा पूल अवजड वाहतुकीसाठी योग्य नाही, अशी माहिती वरिष्ठांना दिली आहे. लवकरच या पुलाजवळ पर्यायी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने अवजड वाहनधारकांनी या पुलाचा वापर करू नये. - आर. टी. अहिरे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम