शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनंतर आता पदाधिकारी हमरीतुमरीवर!

By admin | Updated: December 15, 2015 00:52 IST

रंगतोय कलगीतुरा : पाटण तालुक्यात देसाई-पाटणकर गटाचा भडक्यामुळे राजकीय वातावरण ढवळले

पाटण : पाटण तालुक्यात सदा सर्वकाळ देसाई आणि पाटणकर या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय सवाल-जवाब सुरू असतो. हे सर्वज्ञात आहे. याचा पुळका मात्र आता दोन्ही बाजंूकडील पदाधिकाऱ्यांकडून खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करण्यापर्यंत मजल गेली आहे. पदाधिकाऱ्यांमधील कलगीतुऱ्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ‘नेत्याची भागली आता पदाधिकाऱ्यांची सटकली...’ अशी चर्चा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक करत आहे.ढेबेवाडी विभागात काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात विक्रमसिंह पाटणकर यांना उत्तर देताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले की, ‘सरदार सर्वसामान्य जनतेच्या पंगतीला बसत नाही. मी मात्र, लोकांच्या मांडीला मांडी लावून जेवण करतो.’ यावरून दोन्ही नेत्यांमध्ये मोठी ठिणगी पडली. तर कोयना विभागातील बोपोली गावात झालेल्या रस्ता भूमिपूजनप्रसंगी आमदार शंभूराज देसाई यांनी पाटणकरांवर थेट टीका केली. या टिकेला उत्तर देताना कोयना विभागातील पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी विद्यमान आमदारांवर टीका केली. त्यामुळे संतप्त झालेल्या देसाई गटाने विद्यमान उपसभापती डी. आर. पाटील यांना मैदानात उतरवले. ‘राजाभाऊ शेलार हे पाटणकरांची चमचेगिरी करतात. केवळ पदासाठी नेत्यांच्या मागे लागणारा कार्यकर्ता आहे,’ अशी टीका डी. आर. पाटील यांनी केली. त्याला उत्तर देताना मुंबईच्या शेठला पाटणमध्ये आणून ‘पैशांच्या जोरावर निवडून आणले.या मुंद्रूळकोळे विभागाच्या सदस्याला चिठ्ठीवर उपसभापती पद मिळाले. आमदार देसाई यांनी चमचेगिरी कशी करावी, हे शिकवू नये’ असे प्रतित्तत्तर राजाभाऊ शेलार यांनी दिले. या कलगीतुऱ्यामुळे ‘नेत्यांची भागली आता पदाधिकाऱ्यांची सटकली’ याचा प्रत्यय जनतेला येऊ लागला आहे. हा वाद आणखी काही दिवसांत आणखी विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)भूकंपग्रस्त दाखल्यांसाठी श्रेयवादभूकंपग्रस्त दाखल्यांसाठी आमदार देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर गटांचे बाळासाहेब पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, निकाल लागला आहे. दोन्ही याचिकांवर न्यायालयाने एकच निकाल दिला आहे. यावरून आमदार शंभूराज देसाई अन् विक्रमसिंह पाटणकर या दोन्ही गटांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे.