शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्ती विसर्जनानंतर ट्रॉलीखाली चिरडून विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतारळे : शाळेच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करून परत येत असताना ट्रॅक्टरखाली सापडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तारळे (ता. पाटण) येथे गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.शिवराज संतोष शेलार (वय १४) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तारळे येथे स्वामी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतारळे : शाळेच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करून परत येत असताना ट्रॅक्टरखाली सापडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तारळे (ता. पाटण) येथे गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.शिवराज संतोष शेलार (वय १४) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तारळे येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती विद्यामंदिर असून, याठिकाणी पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. विद्यालयात दरवर्षी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी विद्यालयाच्या खोलीत गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही केली जाते. सातव्या दिवशी या मूर्तीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन होते. यावर्षीही विद्यालयात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गत सात दिवसांपासून शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. मूर्तीचे गुरुवारी विसर्जन असल्याने सकाळपासूनच शाळेत मिरवणुकीचे वातावरण होते. मिरवणुकीसाठी विद्यालयाने ट्रॅक्टर-ट्रॉली बोलावली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शाळेतून ही मिरवणूक निघाली. गावातील मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक वेखंडवाडी रस्त्यावरील गोदामनजीक पोहोचली. तेथून काही अंतरावरच नदीपात्र असल्यामुळे शिक्षकांनी लहान मुलांना त्याचठिकाणी थांबवले. तर गावातील काही युवक तसेच शिक्षकांनी मूर्तीचे विसर्जन केले.विसर्जन झाल्यानंतर शिक्षकांसह काही विद्यार्थी चालत विद्यालयाकडे निघाले. तर शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकणारा शिवराज शेलार हा अन्य काही मुलांसमवेत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसला. ट्रॅक्टर शाळेच्या दिशेने निघाला असताना एका वळणावर ट्रॉलीमध्ये बसलेल्या शिवराजचा तोल जाऊन तो खाली कोसळला. त्याच्या अंगावरून ट्रॉलीचा टायर गेल्याने तो गंभीर जखमी झाला.अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी जखमी शिवराजला उपचारार्थ गावातीलच ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच शिवराजचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिसांत झाली नव्हती.शाळेपासून हाकेच्या अंतरावर दुर्घटनादुर्घटना घडली तेथून हाकेच्या अंतरावरच विद्यालय आहे. संबंधित वळण येण्यापूर्वी ट्रॅक्टरने आणखी दोन वळणे घेतली होती. मात्र, शिवराज त्यावेळी सावध बसला असावा. शाळेनजीकच्या वळणावर मात्र, ट्रॅक्टर ट्रॉलीला झोल बसल्याने शिवराजचा तोल गेला असण्याची शक्यता ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.