शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कपडे आढळल्यानंतर तलावातील पाण्यात शोध !  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:08 IST

गणेश विसर्जनाच्यावेळीच हेमंत प्रकाश वाघ (वय १८, रा. सोनगाव, ता. जावळी. मूळ रा. कळंबे, ता. वाई) या युवकाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्यामुळे सोनगाव व वाघ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ठळक मुद्देसोनगाव व वाघ कुटुंबावर शोककळा घरगुती गणेश विसर्जनादरम्यान युवकाचा मृत्यू   गुजरवाडी येथील तलावातील पाण्यात शोध

सायगाव : गुजरवाडी, ता. जावळी येथील तलावावर घरगुती गणेश विसर्जनासाठी गेल्यावर हेमंत प्रकाश वाघ (वय १८, रा. सोनगाव, ता. जावळी. मूळ रा. कळंबे, ता. वाई) या युवकाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. सर्वजण ट्रॉलमध्ये बसून घरी जात असताना हेमंत दिसून आला नाही. त्याची कपडे तलावाजवळ आढळल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी त्याचा मृतदेह पाण्यात आढळला.  

दरम्यान, गणेश विसर्जनाच्यावेळीच ही घटना घडल्यामुळे सोनगाव व वाघ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद कुडाळ पोलिसांत झाली आहे. 

याबाबत माहिती अशी की, हेमंत वाघ हा सोनगाव या आपल्या आजोळी कुटुंबीयासमवेत राहत होता. हेमंत हा मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी घरगुती गणेशविसर्जन करण्यासाठी गुजरवाडी येथील तलावावर गेला होता. यावेळी गावातील तेरा कुटुंबीय गणेश विसर्जनासठी गेली होती. विसर्जनानंतर सर्वजण ट्रॉलीमध्ये बसले. त्यावेळी हेमंत हा कोठेही आढळून आला नाही.

इकडेतिकडे पाहिल्यानंतर त्याची कपडे तलावाजवळ दिसून आली. पण तो नसल्याचेही लक्षात आले. त्यानंतर अनेकांनी तलावातील पाण्यात शोध घेण्यास सुरुवात केली.

बराचवेळ  शोध घेतल्यानंतर हेमंतला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. मृत हेमंतच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

   या घटनेची माहिती मिळताच मेढ्याचे  पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेची नोंद कुडाळ दूरक्षेत्रात झाली असून  हवालदार सूर्यकांत शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.